Maharashtra Political Crisis: ८२ वर्षीय पवारांच्या वयावरुन राजकारण तापलं; देशातल्या प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांचं वय किती?

Age Of President OF Indian Political Parties: जाणून घ्या देशातील १५ राजकीय पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षांबद्दल...
Age Of President OF Indian Political Parties
Age Of President OF Indian Political PartiesSaamtv
Published On

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात फूट पडल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या सभेत अजित पवार यांनी शरद पवार यांना वयाचा दाखला देत निवृत्त होण्याचा सल्ला दिला. तर त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनीही प्रत्त्युत्तर देताना वय ८२ असो वा ९२... काही फरक पडत नाही. मी राष्ट्रवादीचाही अध्यक्ष आहे. जोपर्यंत चांगले काम करत आहे तोपर्यंत सक्रिय राजकारणात राहीन.. अशा शब्दात ठणकावले...

अजित पवार आणि शरद पवार यांच्या वादानंतर राजकारणातही निवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तविक, सामान्यतः कोणत्याही नोकरदार लोकांचे निवृत्तीचे वय असते. पण कदाचित भारतीय राजकारणात असे काही निश्चित नाही. जाणून घ्या देशातील १५ राजकीय पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षांबद्दल...

Age Of President OF Indian Political Parties
Nashik Crime: एकाच रात्रीत २ घरफोड्या! ८ तोळे सोने लांबवले; सिन्नर तालुक्यात खळबळ...

१. भारतीय जनता पक्ष (भाजप)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP) जगत प्रकाश नड्डा आहेत. (J.P. Nadda) ते 62 वर्षांचे आहेत. 2020 मध्ये ते भाजपचे 11 वे अध्यक्ष बनले. पक्षाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत ते पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. नड्डा हे राज्यसभा सदस्यही आहेत. ते केंद्र सरकारमध्ये आरोग्यमंत्रीही राहिले आहेत.

२. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikaarjun Kharge) आहेत. त्यांचे वय 80 वर्षे आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसची स्थापना झाली. 137 वर्षे जुन्या पक्षात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. पक्षात निवडणूक प्रक्रियेअंतर्गत अध्यक्ष निवडण्याची व्यवस्था आहे. खर्गे हे राज्यसभा सदस्यही आहेत. केंद्र सरकारमध्ये कामगार आणि रोजगार मंत्री राहिले आहेत.

Age Of President OF Indian Political Parties
Kolhapur News : कोल्हापूरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, खेडच्या जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

३. आम आदमी पार्टी (आप)

अरविंद केजरीवाल (Arvinand Kejriwal) हे आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते 54 वर्षांचे आहेत. २०१२ साली दिल्लीत राजकीयदृष्ट्या पक्षाचा जन्म झाला. 'आप'ला 10 वर्षांनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. दिल्लीत सलग तिसऱ्यांदा पक्षाचे सरकार आहे. दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सत्ता सांभाळणारे केजरीवाल हे चौथे मुख्यमंत्री आहेत.

४. बहुजन समाज पक्ष (BSP)

मायावती (Mayavati) या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आहेत. त्या 67 वर्षांच्या आहेत. त्या चार वेळा यूपीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. 1995, 1997, 2002 आणि 2007 मध्ये जबाबदारी स्वीकारली. जून 1995 मध्ये भाजप आणि इतर पक्षांच्या बाहेरून पाठिंबा मिळाल्याने मायावती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ केवळ 4 महिन्यांचा होता.

Age Of President OF Indian Political Parties
Pankaja Munde News: 'मला जे काही करायचंय ते डंके की चोट पर करेन'; पंकजा मुंडेंनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना दिला पूर्णविराम

५. नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)

एनपीपीचे अध्यक्ष सी आहेत. ते 45 वर्षांचे आहेत. NPP ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने मेघालयात आहे. ईशान्येतील हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. याची स्थापना (एल) पूर्णो अगितोक संगमा यांनी केली होती. 2022 च्या निवडणुकीत NPP हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. कोनराड संगमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

६. बिजू जनता दल (BJD)

नवीन पटनायक बीजेडीचे प्रमुख आहेत. ते 76 वर्षांचे आहेत. ते सलग पाच वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. 2005 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 22 वर्षांपासून ते मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. हा पक्ष 26 वर्षांचा आहे. बीजेडीची स्थापना 26 डिसेंबर 1997 रोजी झाली. नवीन आधी खासदार, नंतर केंद्रीय मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री झाले. आतापर्यंत एकही निवडणूक न पराभूत झालेला हा बहुधा एकमेव प्रादेशिक पक्ष आहे.

७. भारत राष्ट्र समिती (BRS)

बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) आहेत. ते 69 वर्षांचे असून ते तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. 2018 मध्ये ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. पूर्वी हा पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखला जायचा. ही 20 वर्षे जुनी पार्टी आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा अजेंडा घेऊन TRS ची स्थापना 2001 मध्ये झाली.

८. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)

सीपीआय पक्षाची कमान डी राजा यांच्याकडे आहे. ते पक्षाचे सरचिटणीस असून त्यांचे वय ७४ वर्षे आहे. या पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एमएन राय यांनी केली होती.

Age Of President OF Indian Political Parties
Devendra Fadnavis on Pankaja Munde : पंकजा मुंडे 2 महिने ब्रेक घेणार, नाराजी असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

९. तृणमूल काँग्रेस (TMC)

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आहेत. त्या 68 वर्षांच्या आहेत. ममता त्यांच्या अधिकृत वयापेक्षा 5 वर्षांनी लहान आहेत. याचा खुलासा त्यांनीच केला. 2021 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत.

यापूर्वी त्यांनी 20 मे 2011 रोजी पहिल्यांदा आणि 27 मे 2016 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांनी 1998 मध्ये टीएमसीची स्थापना केली. त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री देखील आहेत.

१०. राष्ट्रीय जनता दल (RJD)

आरजेडीचे संस्थापक लालू प्रसाद यादव (LaluPrasad yadav) आहेत. ते 75 वर्षांचे आहेत. लालू यादव यांनी 5 जुलै 1997 रोजी पक्षाची स्थापना केली. पक्षाचा मुख्य प्रभाव बिहार आणि झारखंड या राज्यात आहे. दोषी ठरल्यानंतरही लालूंनी पक्षाची सूत्रे सांभाळली.

ते अजूनही आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लालूंनी 1977 मध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. 1990 ते 1997 पर्यंत ते बिहारचे मुख्यमंत्री होते. नंतर 2004 ते 2009 या काळात त्यांनी केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com