शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीमध्ये निर्धार सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. येत्या काही दिवसात पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार आहे.
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमध्ये रंगणार आहे. याच सामन्यावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोंदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजप 'इंडिया' आघाडीची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करते. मात्र या इंडियन मुजाहिद्दीनला पाठिंबा पाकिस्तान देतो ना. मग आता जो वर्ल्ड कप होत आहे, त्यात भारत-पाकिस्तानचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियममध्ये होत आहे. हेच तुमचं हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंना उपस्थित केला.
भारत-पाकिस्तानचा सामना तुमच्या स्टेडियममध्ये खेळवणार आणि देशप्रेमाचे धडे तुम्ही आम्हाला देणार. मग सुषमा स्वराज बऱ्या होत्या. त्यांना सडकून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशातील घुसखोरी थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही पाकिस्तान सोबत कोणताही संबंध ठेवू इच्छित नाही, याला म्हणतात देशप्रेम. (Latest news in marathi)
मात्र एका बाजून जाऊन मिठ्या मारायच्या आणि आमच्या देशद्रोहाचे आरोप करायचे. मोदीची हे तुम्हाला अजिबाज शोभत नाही.
भारत-पाकिस्तान सामना खेळवणार आहात तिथे कुलभूषण जाधव यांना बोलवणार आहात का? कुलभूषण जाधवांना सोडवण्यासाठी तुम्ही काय करताय? कुलभूषण जाधव जिवंत आहे की नाही हे देखील आज माहिती नाही. पण आपण निर्लज्यासारखे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहोत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.