Uddhav Thackeray News saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

आम्ही आमचं हिंदुत्व काय आहे हे स्पष्ट केलं. चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला. भारतीय जनता पक्ष...बाळासाहेब नेहमी त्यांना कमळाबाई म्हणायचे. मी यासाठी कमळाबाई बोलतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Vishal Gangurde

Uddhav Thackeray News:

'आम्ही आमचं हिंदुत्व काय आहे हे स्पष्ट केलं. चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला. भारतीय जनता पक्ष...बाळासाहेब नेहमी त्यांना कमळाबाई म्हणायचे. मी यासाठी कमळाबाई बोलतोय, कारण बाळासाहेबांनी सांगितलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला आहे. ते रायगडमध्ये बोलत होते. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रायगड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील माणगावमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'माझ्या लोकांवर ईडी, सीबीआय लावता. एवढी हिंमत आहे तर चीनवर सोडा ना.. तो घुसलाय तिकडे. मी पंतप्रधान मोदींना शत्रू मानत नाही, पण ते मला मानतात. त्यात माझी काय चूक? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'2014 साली असं काय झालं की तुम्ही युती तोडली. लगेच सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व काय बाळासाहेबांचे धोतर आहे काय? आमच्याकडे काळी टोपी नाही, आमच्याकडे काळ्या मनाची माणसं नाहीत. आमच्याकडे भगव्या मनाची भगव्या टोपीची माणसं आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराणचं कसं संरक्षण हे इतिहासात आहे. एक कोण तरी चमचा बोलला बिलकीस बानोची म्हणून घेतली. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक पाकिस्तानात कापला नाही. ज्याने भारताची फाळणी केली, त्या जिनाच्या थडग्यावर आम्ही डोकं ठेवलं नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

'आमचं हिंदुत्व हे आला अंगावर तर घेतलं शिंगावर. कुरुलकर ज्याने भारताची माहिती दिली, त्याबाबत भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आम्ही आमचं हिंदुत्व काय आहे हे स्पष्ट केलं, असंही ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT