Congress Leader Kiron Kale Joins Shiv Sena  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, मविआत अंतर्गत वाद?

Congress Leader Kiron Kale Joins Shiv Sena : हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली आणि आज किरण काळे यांनी पक्षाला रामराम ठोकला.

Saam Tv

मुंबई: अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आज ठाकरेंच्यासेनेत प्रवेश करून ते शिवबंधनात अडकले आहे. महाविकासआघाडीतच एकमेकांच्या पक्षात प्रवेश होत असल्याने आघाडीत बिघडीची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत वार्तालाप करत असताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

पुढे ते म्हणाले, आज गाडगेबाबांचं स्मरण केलं पाहिजे. धर्म जगायचा असतो. सांगायचा नसतो, असं गाडगेबाबा नेहमी सांगायचे. शिवाजी महाराजांनीही दुसऱ्यांचा द्वेष कधी केला नाही आणि द्वेष करा असे शिकवले ही नाही सांगितलं. ज्यांनी धर्माचा खेळखंडोबा केला आहे, त्यांचं मुस्लिम प्रेम कसं आहे. यावर मी भाषण करू शकतो. भाजप निवडणुकीपुरती धर्मांधता माजवत आहे. हे देशाला चांगल्या दिशेने नेईल असे मला वाटत नाही असे ही ते म्हणाले.

असे सांगतानाच माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचं रक्षण करणं हे यांचं हिंदुत्व आहे का? न्यू इंडिया इन्शुरन्स बुडाली, ज्यांच्यामुळे बुडाली त्यांचं रक्षण करणं भाजपचं हिंदुत्व आहे का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

न्यायालयाने तत्परता दाखवावी

यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या निकालाची प्रत आली नसल्याचे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने तत्परता दाखवावी. आमच्याबाबतचा निकाल लागला नाही. याबाबत निकाल लागला. त्यामुळे किमान प्रत तरी नार्वेकरांच्या हाती द्यावी. न्यायालयाच्या प्रतीचा मान आदर, सन्मान राखणारे असतील तर आमच्याबाबत दिलेला न्याय दिला तो न्याय कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला.

नीलम गोऱ्हे यांनी पावत्या घेऊन या

विधानसभेच्या उपसभापती यांनी काहीवेळा पूर्वीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुलाखती दरम्यान एक खळबळजनक आरोप केला की उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्या की ते एक पद मिळते. यावरच संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना आव्हान दिले, उद्धव ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदार केलं. महिला आघाडीचा विरोध असताना त्यांना आमदारकी दिली. विधान परिषदेचं उपसभापती बनवलं. त्यांनी उद्धव ठाकरेंना आठ मर्सिडीज दिल्या का? पावत्या घेऊन याव्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT