BJP MLA Threat : तुझे तुकडे तुकडे...भाजप महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी

Shweta Mahale Received Threat Letter : भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
भाजप आमदार श्वेता महाले यांना धमकी
Shweta Mahale Newssaam tv
Published On

संजय जाधव, बुलडाणा | साम टीव्ही

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार स्फोटानं उडवून देण्याची धमकी आल्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञातांकडून धमकीचं पत्र त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आलं आहे. या धमकीसत्रामुळं राजकीय नेते, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्राद्वारे महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानी त्यांना हे पत्र पाठवण्यात आले होते. श्वेता महाले यांनी आज आपल्या समर्थकांसह चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आमदार श्वेता महाले यांना आलेल्या धमकीच्या पत्रात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे.

भाजप आमदार श्वेता महाले यांना धमकी
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या धमकी प्रकरणात ट्विस्ट, बुलडाणा कनेक्शन उघड; 'ते' दोघे नेमके कोण?

पत्रात नेमकं काय?

याबबत आमदार श्वेता महाले यांनी स्वत: माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. तुला जीवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती, असा उल्लेख या पत्रात केला असल्याचे श्वेता महाले यांनी सांगितले. काल माझ्या कार्यालयामध्ये पत्र आलं. एका लिफाफ्यात तीन पत्रे होती. त्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असंही त्या म्हणाल्या.

भाजप आमदार श्वेता महाले यांना धमकी
Eknath Shinde receives threat : कार उडवून देण्याची धमकी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, VIDEO

भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यावर धडक

आमदार श्वेता महाले यांना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक आक्रमक झाले आहेत. श्वेता महाले यांचे कार्यकर्ते आणि समर्थक थेट पोलीस ठाण्यात गेले. आरोपीला तात्काळ अटक करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

एकनाथ शिंदेंनाही आली होती धमकी

शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील नुकतीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तशा आशयाचा मेल मुंबई पोलिसांना मिळाला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी २ संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com