Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांची जेव्हा इच्छा होईल, तेव्हा कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात (Disha Salian death case) अटक होऊ शकते, असा दावा तिवारी यांनी केला आहे. किशोर तिवारी हे याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनामध्ये होते. काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. (Aditya Thackeray's Arrest Imminent, Claims Former Thackeray Ally Kishore Tiwari)
दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian death case) यांनी आत्महत्या केली होती. दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. दिशा सालियन यांनी आत्महत्या केली नाही, त्यांचा जीव घेतला गेला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. आता किशोर तिवारी यांनी याप्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा इच्छा होईल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल, असे किशोर तिवारी म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर किशोर तिवारी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंभीर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीला काही नेते जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला होता. संजय राउत, विनायक राउत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्री आणि शिवसेना भवनावर कब्जा केल्याचा दावा केला होता. त्यानंतर तिवारी यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.