Uddhav Thackeray addresses party workers while launching an attack on BJP over the Ram Temple theft controversy. saam tv
महाराष्ट्र

ठाकरेंना हवा भाजपमुक्त राम, राम मंदिरातील चोरीविरोधात ठाकरेसेनेचं आंदोलन

Uddhav Thackeray Bjp Free Ram Maharashtra Politics: राममंदिरातल्या चोरीवरून आता महाराष्ट्रात राजकारण पेटलंय. ठाकरेंनी थेट भाजपमुक्त रामची घोषणा दिलीय. यासाठी ठाकरेंनी काय रणनीती आखलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

राम मंदिरातील पैशांच्या चोरीवरून देशात राजकारण तापलेलं असताना आता महाराष्ट्रातही या चोरीचे पडसाद उमटलेत...विरोधकांनी राम मंदिरातील चोरी प्रकरणावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय... राम मंदिरातल्या चोरीचा मुद्दा देशभरात गाजतोय. त्यामुळे भाजपला घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघातल्या दौऱ्यात याच मुद्द्याला हात घातलाय. भाजपमुक्त राम हवा, अशा शब्दात हल्लाबोल केलाय. इतकचं नव्हे तर राज्यात राम मंदिरातील चोरीविरोधात आंदोलन उभारणार असल्याची घोषणाही ठाकरेंनी केलीय.

तर मतदारांनी आधीच महाराष्ट्र ठाकरेमुक्त केल्याचा पलटवार मंत्री गिरीश महाजनांनी केलाय.

उद्धव ठाकरेंच्या या 'भाजपमुक्त राम' मोहिमेच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. राम मंदिर आंदोलनापासून मंदिर निर्माणापर्यंत भाजपनं नेहमीच आक्रमक पवित्रा घेतलाय...अशातच विरोधकांनी 1400 कोटी रुपयांची चोरी राम मंदिरात झाल्याचा आरोप केल्यानं एकच खळबळ माजलीय... त्यात राम मंदिराच्या मुद्द्यावरूनच ठाकरेंनी भाजपला घेरल्यानं पुन्हा हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT