Uddhav Thackeray addresses public rally, makes explosive claims on Fadnavis, Shinde and BJP’s internal politics. saam tv
महाराष्ट्र

शाहांकडून शिंदेंना फडणवीसांची सुपारी, फडणवीसांच्या खुर्चीसाठी ठाकरेंचं साईबाबांना साकडं, पंतप्रधानपदासाठी फडणवीसांना ठाकरेंचा पाठिंबा?

Uddhav Thackeray Supari Claim Fadnavis Shinde Bjp 2029 Pm Race: फुटीर खासदारांच्या मतदारसंघात केलेल्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि शिंदेबाबत मोठा दावा केलाय. २०२९ मध्ये कोण-कोण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत आणि कोण कुणाचा काटा काढतोय? कोणी कोणाची सुपारी दिलीय? याचे मोठमोठाले दावेच उद्धव ठाकरेंनी केले..त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट

Snehil Shivaji

हा तोच विमान प्रवास आहे ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचं वादळ उठवलं. शिवसेनेतील पडझड रोखण्यासाठी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन पुर्नबांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दौरा केला खरा पण या यादौऱ्यात त्यांनी शिवसेनेऐवजी फडणवीसांच्या प्रमोशनसाठी मोर्चेबांधणी केल्याचं जास्त दिसलं.कारण उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांचा तर समाचार घेतलाच परंतू याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांची खुर्ची वाचावी यासाठी थेट साईबाबांना साकडं घातलं. आणि पंतप्रधानपदासाठी देवेंद्र फडणवीसांना उघड उघड पाठींबा देण्याचे संकेत दिले.

मात्र अमित शाहांनी 2029 मधील पंतप्रधानपदासाठी प्रादेशिक पक्षांमध्ये फोडाफोडी सुरू असल्याचा दावा यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी केलाय. आणि त्यामुळेच हे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचंही त्यांनी जाहीर सभांमधून सांगितलं. एवढंच नव्हे फडणवीसांना गुंतवून ठेवण्यासाठी अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना फडणवीसांची सुपारी दिल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिलीय.

पुर्ण दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसाठी मोर्चेबांधणी केली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्षावर त्यांनी अचूक नेम धरल्यानंतरही फडणवीसांनी या चर्चांना फुलस्टॉप देण्याऐवजी शुभेच्छा स्विकारत असल्याचं सूचक विधान केलं.

शिवसेनेचे खासदार फोडून एकनाथ शिंदेंचं वजन एनडीएमध्ये नक्कीच वाढलंय. शिंदेंची सेना एनडीए मध्ये तिसरा मोठा पक्ष ठरलाय. केंद्रात पुर्ण बहुमत नसल्यानं मोदी सरकार चंद्राबाबूच्या टिडीपी आणि नितीशकुमारांच्या जेडीयूच्या टेकूवर पुन्हा सत्तेत आली या समीकरणानुसार, दिल्लीत पाठिंबा देण्याच्या बदल्यात आंध्रप्रदेशात चंद्राबाबू आणि बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री झाले होते. आता नेमका हाच फॉर्मृला महाराष्ट्रातही लागू झाला, तर देवेंद्र फडणवीसांची राज्यातील खुर्ची धोक्यात येऊ शकते. आणि हेच उद्धव ठाकरे वारंवार अधोरेखित करत आहेत. त्यामुळेच मुंबई ते नागपूर विमानप्रवासातील उच्चस्तरीय चर्चेचा विषय नेमका हाच होता की काय अशी चर्चा आता राजकीय विश्वात रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जालन्यात FDA ची मोठी कारवाई, मन:प्रभावी औषधांचा बेकायदेशीर साठा जप्त

नवऱ्याचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी वडाच्या झाडाला महिलेनं बांधल्या दारूच्या बाटल्या

नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा, अवघ्या 60 दिवसांत खटला निकाली

Maharashtra News Live Update: शिवसैनिकांडून चोरट्याविरोधात "ऑपरेशन तुडवा "...

म्हणे हे ‘लोकप्रतिनिधी’! महापालिकेत सत्ताधारी नगरसेवकांमध्येच शिवीगाळ, शहराचा विकास कसा करणार?

SCROLL FOR NEXT