महाराष्ट्र

Uddhav Thackarey: फडणवीसांनंतर ठाकरेंच्या निशाण्यावर शहा; विधानसभेच्या नेतृत्वासाठी ठाकरेंची खेळी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे फडणवीस आणि भाजपविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. आधी फडणवीसांना लक्ष करणाऱ्या ठाकरेंनी आता आपला मोर्चा थेट अमित शाहांकडे वळवलाय. मात्र याचं नेमकं कारण काय? ठाकरे अधिक आक्रमक का झालेत? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

ऐकलंत जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येतायत. तसतसे उद्धव ठाकरे अधिक आक्रमक होताना दिसतायत. त्यातच एकतर तु राहशील किंवा मी, असा निर्वाणीचा इशारा ठाकरेंनी फडणवीसांना दिला होता. मात्र तो इशारा फडणवीसांना नव्हे तर भाजपला उद्देशून बोलल्याचं दिल्याचं सांगतानाच ठाकरेंनी पुन्हा एकदा नाव न घेता फडणवींवर शेलक्या शब्दात टीका केली. ढेकणं, लायकी अशा शब्दांचा वापर करत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. तर ठाकरेंचा डोक्यावरचा ताबा सुटलाय असा पलटवार फडणवीसांनी केलाय.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे चांगले मित्र. मात्र 2019 मध्ये सत्तेचं समीकरण बदललं आणि मैत्रीचं रुपांतर राजकीय शत्रूत्वात झालं. त्यातच शिवसेना फूटली आणि या शत्रूत्वाच्या आगीत तेल ओतल्याची भावना ठाकरेंची झाली. तर ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता असा आरोप देशमुखांनी केल्यामुळे ठाकरे अधिकच आक्रमक झाले. आणि आतातर त्यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्यावरून अमित शाहांनावरही जोरदार हल्ले चढवत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेमागे राज्याच्या सत्तेचं आणि पक्षाला पुन्हा उभं करण्याची रणनीती असल्याचं बोललं जातंय. त्यामागे आणकी काय कारणं आहेत ती पाहूयात.

उद्धव ठाकरे आक्रमक का?

शिवसेना फोडण्यास फडणवीस कारणीभूत हा ठाकरेंचा समज

फडणवीसांना लक्ष करून विरोधी पक्षाची पूर्ण स्पेस मिळवण्याचा प्रयत्न

भाजपविरोधात गेलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न

ठाकरेंना शिवसेना फुटीची सहानुभूती असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र लोकसभा निवडणूकीत हवा तेढा फायदा ठाकरे गटाला झाला नाही. त्य़ामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ताधा-यांना सर्वाधिक आक्रमकपणे अंगावर घेऊन विरोधकांचं नेतृत्व आपल्याकडे ठेवण्याची ठाकरेंची रणनीती असल्याचं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT