Uddhav Thackeray and Raj Thackeray joint rally in Mumbai 
महाराष्ट्र

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

Thackeray Brothers Rally: देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरेबंधूंनी नवी रणनीती आखलीये. महापालिका निवडणुकीनंतर उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. ठाकरेबंधूंनी आखलेली नवी रणनीती काय आहे? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातील राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. महाराष्ट्रात काँग्रेस आणि वंचितच्या आंदोलनानंतर ठाकरे बंधूही आता मैदानात उतरले आहेत. दिल्लीत पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात ठाकरे बंधूंनी 26 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर मोर्चात घुसखोरी करणाऱ्यांनाही ठाकरेशैलीत इशारा देण्यात आलाय.

एव्हढंच नाहीतर विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सरन्यायाधीशांच्या विधानाचाही ठाकरेबंधूंनी खरपूस समाचार घेतलाय. तर दुसरीकडे, ठाकरे बंधूंनी दिलेल्या मोर्चाच्या घोषणेचा मुख्यमंत्री फडणवीसांनी समाचार घेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांच्या भेटीला उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते. तर मुंबईत राज ठाकरेंनी शिवतीर्थवर आंदोलक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. मात्र दिल्लीतल्या आंदोलनाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यामुळे या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळणार? याबाबत उत्सुकता असली तरी त्याआधीच केंद्र सरकार प्रधानांचा राजीनामा घेऊन विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खड्ड्यांमुळे चाकणमधील उद्योग जाणार, 4 हजार कुटुंब रस्त्यावर येणार

नेत्यांच्या काड्या, शिवसेना फोडा, शिवसेना सरदारांचाच एकमेकांवर गद्दारीचा आरोप

Fact Check: सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप? विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाची नवी योजना?

महाराष्ट्रात 5 वर्षांत 36,000 कंपन्या बंद, केंद्र सरकारची लोकसभेत धक्कादायक माहिती

देवेंद्रदारी वर्षा बंगल्यावर 'राज'कारण, दोन्ही नेत्यांमध्ये 'वर्षा'वर खलबतं?

SCROLL FOR NEXT