udayanraje bhosale shivendraraje bhosale 
महाराष्ट्र

काेणी असाे अथवा नसाे; सातारची पब्लीक आहे ना बस्स झालं! उदयनराजे

ओंकार कदम

सातारा : सातारा पालिकेच्या अंतर्गत येणा-या विविध विकासकामांचा धडाका खासदार उदयनराजे भाेसले यांनी लावला आहे. दूसरीकडे आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी वर्ष लागतात असा टाेला नुकताच उदयनराजेंना आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी लगावला. सातारा पालिकेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले हे तुमच्या समवेत असणार का असा प्रश्न विचारला असता खासदार उदयनराजे म्हणाले साता-याची जनता माझ्यासमवेत आहे, काेणी असाे अथवा नसाे. त्यामुळे आगामी काळातील सातारा पालिकेच्या निवडणुकीत दाेन्ही राजेंच्या udayanraje bhosale shivendraraje bhosale आघाडी एकत्र लढणार की नाही याची उत्सुकता नारिकांना लागून राहिली आहे.

सातारा शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज (बुधवार) खासदार उदयनराजे भाेसले यांच्या हस्ते झाला. यावेळी पालिकेचे उपाध्यक्ष मनाेज शेंडे, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, माजी उपाध्यक्ष नगरसेवक राजू भाेसले यांच्यासह सातारा विकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका ,ग्रामस्थ, महिला, जेष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी रयत शिक्षण संस्था येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवानद केले. शिक्षणाची ज्ञानगंगा जन सामान्यांपर्यंत पोहचवणारे कर्मवीर अण्णांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थारुपी रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे अशी भावना व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT