Udayanraje Bhosale vs Bhagat Singh Koshyari  Saam TV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : ...तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं; रायगडावर उदयनराजे संतापले

राज्यपाल कोश्यारी जर इथे असते, तर त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं,असा संताप उदयनराजेंनी बोलताना व्यक्त केला आहे.

Dnyaneshwar Choutmal

Udayanraje Bhosale Latest News : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या विधानाचा विरोध करताना अनेक नेत्यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी केलीये. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून रायगडावरून बोलताना त्यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केलाय. (Maharashtra Politics News)

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असं म्हणत उदयनराजेंनी परखड शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर टीकास्र सोडलंय. इतकंच नाही तर, त्याची (राज्यपाल कोश्यारी) उचलबांगडी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, ते जर इथे असते तर त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं, असा संताप देखील उदयनराजेंनी बोलताना व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह उदयनराजेंनी भाजपलाही चांगलंच सुनावलं आहे. सर्वच पक्षांनी सोईनुसार महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. यापुढे हे चालणार नाही म्हणत सर्वच राजकारण्यांची लाज काढली आहे. उदयनराजे यांनी सर्वधर्म समभाव हा शिवाजी महाराजांनी अमलात आणला होता, तो फक्त नावालाच राहिल्याने उदयनराजे यांनी त्यावरून हल्लाबोल केला आहे. वेगवेगळी विधाने करून देशाचे तुकडे होतील, देश महासत्ता होणार नाही असेही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

रायगडावरून केली मोठी घोषणा

दरम्यान, उदयनराजेंनी रायगडावरून एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच मुंबईतल्या आझाद मैदानावर जाऊ, आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ', अशी घोषणा उदयनराजे भोसलेंनी यावेळी केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील बुधवार पेठेत भयंकर घडलं; चिठ्ठी लिहून तरूणीनं ९व्या मजल्यावरून उडी घेतली, आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

Medical Education Scam : मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा, महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये कॉलेजांवर धाड

Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११ कोटींची लूट टळली

Bhindi Bhaji Benefits: हिवाळ्यात भेंडी खा, हाडे दुखींना मिळेल आराम

IND vs SA: टेस्टमधील दारूण पराभवानंतर कोचपदावरून गंभीरची हकालपट्टी? अखेर बीसीसीआयने दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT