Udayanraje Bhosale Dolby News ओंकार कदम
महाराष्ट्र

Satara: कॉलर उडवत प्रशासनाला चॅलेंज; डॉल्बीबंदी असतानाही थिरकले खासदार उदयनराजे

Udayanraje Dance News: एका कार्यकर्त्याच्या डॉल्बी सिस्टमचे (लाऊडस्पीकर) उद्धाटन करताना उदयनराजेंनी कॉलर उडवत प्रशासनाला एक प्रकारे ओपन चॅलेंज दिले आहे.

ओंकार कदम

सातारा: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे आपल्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलने सतत चर्चेत असतात. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल तर त्याच्या समर्थकांना भुरळ पाडते. मात्र, अनेकदा यामुळे त्यांच्यावर टीकाही होत असते. यंदाही त्यांच्या अशाच एका कृत्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. एका कार्यकर्त्याच्या डॉल्बी सिस्टमचे (लाऊडस्पीकर) उद्धाटन करताना उदयनराजेंनी कॉलर उडवत प्रशासनाला एक प्रकारे ओपन चॅलेंज दिले आहे. (Udayanraje Bhosle Latest News)

हे देखील पाहा -

सातारा (Satara) जिल्हा पोलिसांनी डॉल्बीला बंदी असल्याचे सांगितले आहे. मात्र, खासदार उदयनराजेंनी समर्थकांच्या डॉल्बी सिस्टीमचे उद्घाटन करताना कॉलर उडवून प्रशासनाला एक प्रकारे चॅलेंजच दिले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्सव काळात डॉल्बीबंदी उठवली पाहिजे असं सांगत डॉल्बी वाजलीच पाहिजे असा इशाराच प्रशासनाला दिला आहे. डॉल्बी सिस्टीम वाजवण्यावर बंदी असल्याने सिस्टीम मालक आर्थिक संकटात सापडले असल्याचे ते म्हणाले होते. सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लाखो रुपयांची डॉल्बी सिस्टीम विकत घेतली असून याचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या करण्यात आले.

यावेळी उदयनराजेंच्या नावाने तयार करण्यात आलेले गाणे डॉल्बी सिस्टीमवर लावण्यात आले होते. उदयनराजेंनी डॉल्बीच्या तालावर थिरकत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाईंग किस देत हातवारे करत कॉलर उडवून प्रशासनाला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT