udayanraje bhosale, sharad pawar, rayat shikshan sanstha, satara saam tv
महाराष्ट्र

Udayanraje News : उदयनराजेंचा पवार कुटुंबियावर गंभीर आराेप म्हणाले...,

अण्णांचा वारसा सांगणा-यांनी थाेडं तरी बाेलावं असेही उदयनराजेंनी म्हटलं.

ओंकार कदम, Siddharth Latkar

Satara : रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा असा टाेला खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी आज (साेमवार) सातारा येथे लगावला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या (rayat shikshan sanstha) मुख्य कार्यालयासमाेर एक आंदाेलन सुरु आहे. त्यावर माध्यमांशी उदयराजेंना छेडलं असता त्यांनी अण्णांच्या हेतूला बाधा पाेहचत आहे असे म्हटलं. राजघराण्यानं रयतला जागा दिली. ज्यांचा काही याेगदान नाही अशा लाेकांना रयतमध्ये घेतलं जातं असेही राजेंनी नमूद केले. (Breaking Marathi News)

उदयनराजे म्हणाले राजमाता सुमित्राराजे भाेसले यांनी रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. त्यावेळीस मी लहान हाेताे. अण्णा (कर्मवीर भाऊराव पाटील) आणि आज्जी (सुमित्राराजे) हे नेहमी समाजासाठी कार्यरत हाेते. ही गाेष्ट नेहमी माझ्या कानावर पडत असतं. आज या संस्थेचा पुर्वीचा हेतु राहिला आहे असं वाटत नाही.

रयतमध्ये राजकारण येऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध असावेत असं हाेते. मग असं काय झालं आणि अचानक बदल झाला आणि हे त्यात आले. काही लाेकांना सवय लागली आहे. हे माझं, तुझं ते माझं, माझं ते माझं सगळं माझं, त्याचं ते माझं अहाे पण किती. ज्यांचे याेगदान नाही त्यांना तुम्ही घेताय. मी म्हणताे मला घेऊ नका. पण हे घेणारे काेण. काेण हे. आम्ही दिले आहे. यांनी काय केलं दिलं नाही फाेडलंय. रयतचं नाव बदलून टाका. रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था.

ज्या कुटुंबाची संख्या जास्त त्यांचे नाव द्या. संख्या जास्त काेणाची आहे. पवार कुटुंबियांची. मग करा पवार शिक्षण संस्था असेही उदयनराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला

Bank Jobs 2025 : मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि २२,००० रुपये पगार मिळवा

Viral Video: जीव धोक्यात घालून महिलेने दरोडेखोरांना शिकवला धडा, थेट ऑटोरिक्षाला लटकली...

Rahuri Rasta Roko : नगर- मनमाड महामार्ग रोखला; रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांनी 13 वर्षीय अभिनेत्रीला केली होती किस, सुपरस्टारबद्दल धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT