udayanraje bhosale & shivendraraje bhosale. satara politics Saam Tv
महाराष्ट्र

वेळ आल्यावर त्यांना उघड पाडणार : उदयनराजे, त्यांची बुद्धीभ्रष्ट झाली : शिवेंद्रराजे

दाेन्ही राजे पुन्हा एकमेकांवर टीका करु लागले आहेत.

ओंकार कदम

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांच्यामध्ये पुन्हा एकदा शीत युद्ध रंगले आहे. आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद (zilla parishad), पंचायत समिती (panchayat samiti) तसेच पालिका (muncipal council) निवडणुकीच्या (election) तोंडावर आता दोन्ही राजांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. (udayanraje bhosale latest marathi news)

खासदार उदयनराजे यांनी (satara) जावळी (jawali) तालुक्यातील एका कार्यक्रमामध्ये आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता त्यांच्यावर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या बाबत गंभीर आरोप केले. या आरोपाला उत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

छत्रपती घराण्याचा वारसा सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांचे (chhatrapati shivaji maharaj) आचार-विचार आचरणात आणून जोपासले पाहिजेत. कारखान्यांमधील सभासद हा कारखान्याचा मालक आहे. कारखान्याच्या नावाखाली चाललेला अतिरेक हा कुठेतरी थांबवला पाहिजे. कारखाना हा लोकांच्या कष्टावर उभा केला आहे. कारखान्याच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार झाले आहेत. तो भ्रष्टाचार वेळ आली की मी उघड करणार असल्याचा इशारा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिला. दरम्यान कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुद्दामहून गळचेपी केली जात आहे, असा आरोपही उदयनराजेंनी केला आहे.

या आराेपास आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले कारखान्या बद्दल कारखान्याच्या सभासदांनी आणि कारखान्याला ऊस घालणा-यांनी कारखाना बद्दल बोलावं. उदयनराजे सभासद नाहीत तर त्यांचा बोलायचा संबंध येत नाही. त्यांनी कधी शेती केली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत बोलू नये. पंधरा दिवसाला पेमेंट दिले पाहिजे असे कायद्यात तरतूद आहे. अजिंक्यतारा कारखाना (ajinkyatara sugar factory) दहा दिवसात पैसे जमा करतो. मग साफ भ्रष्टाचार आहे असं उदयनराजेंना म्हणायचं आहे का नेमकं त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. वय वाढेल तसं बुद्धिभ्रष्ट व्हायला लागते असं काही त्यांच्याबाबत झाला आहे का असा सवाल यावेळी शिवेंद्रराजेंनी (shivendraraje bhosale) उपस्थित केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT