Uday Samant / Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Uday Samant : विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संताजी, धनाजीप्रमाणे दिसतात; उदय सामंत यांचा टोला

Political News : भरतशेठ मंत्री व्हावे ही माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संताजी, धनाजीप्रमाणे दिसतात, असा टोला उदय सामंत यांना लगावला आहे.

उदय सामंत यांनी म्हटलं की, पूर्वीच्या काळात मोघलांना संताजी, धनाजी दिसायचे. तसे आता विरोधकांना एकनाथ शिंदे दिसतात. म्हणून सकाळपासून त्यांच्यावर टीका करतात, असा टोला सामंत यांनी नाव न घेता लगावला.

रायगडमध्ये मी पालकमंत्री असलो तरी भरतशेठ विकासकामाच पत्र घेऊन येतात आणि मी सही करतो, अशी कबुली उदय सामंत यांनी माणगावमध्ये सभेदरम्यान दिली. सही केली नाहीतर मुंबईहून रस्त्याने रत्नागिरीला जाऊ देणार नाही, अशी दादागीरी भरतशेठ करतात, असंही सामंत यांनी मिश्किलपणे सांगितले. (Political News)

आदित्य ठाकरे यांना ब्रिफ करणारे चुकीचे

आदित्‍य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार तसेच उदय सामंत यांच्या परदेश दौऱ्यावर केलेल्या भाष्यावर सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आदित्‍य ठाकरे यांना ब्रीफ करणारे चुकीचे ब्रीफ करत आहेत. वाघनखे महाराष्ट्रात यावी ही अभिमानास्पद बाब आहे. (Latest News Update)

त्यासाठी मुख्यमंत्री व सुधीर मुनगंटीवार प्रयत्नशील आहेत. मी एमआयडीसीच्या अभ्यासासाठी जात आहे. माझा परदेश दौरा पूर्ण झाला की त्याचा खर्च नेमका कुणी केला, याचा तपशील घेऊन स्वतः आदित्‍य ठाकरे यांनीच जाहीर करावे असं उदय सामंत म्हणाले.

भरत गोगावले मंत्री व्हावे आमचीही इच्छा

भरतशेठ मंत्री व्हावे ही माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे. भरतशेठ लवकरच मंत्री होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भरतशेठ यांच्यावर विशेष प्रेम आहे, असंही उदय सामंत यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News! गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत होणार सुरू, इतक्या वेळात पोहचणार, वाचा संभाव्य मार्ग

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

SCROLL FOR NEXT