सचिन गाड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकांचा सिलसिला सुरुच आहे. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास बैठक चालली.
राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तसेच कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, गणेशोत्सवात अजित पवार 'वर्षा'वर गणपतीच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे अजित पवार सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या चर्चांदरम्यान तिन्ही नेत्यांमधील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. (Latest News Update)
याशिवाय आदित्य ठाकरे यांनी करदात्यांच्या पैशांवर परदेश दौऱ्यांबाबत राज्य सरकारवर निशाणा साधला असताना ही बैठक महत्त्वाची ठरली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांवर मोठा आरोप केला आहे.
विद्यमान सरकारचे मंत्री जनतेच्या पैशातून परदेश दौरे करत असल्याचे आदित्य यांनी म्हटले होते. मंत्री जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आदित्य ठाकरे सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Politics News)
दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठीचं आंदोलन सुरु आहे. तर मनोज जरांगे पाटील देखील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांना दिलेली डेडलाईनही जवळ येत आहे. त्यामुळे अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.