Uday Samant  Saam Tv
महाराष्ट्र

Hanuman Chalisa: राणांना माताेश्रीचा पल्ला लांब : उदय सामंत

काेल्हापूरच्या विजयानंतर माझ्या ट्विटचा निशाणा कुणावरही नाही.

अमोल कलये

रत्नागिरी : रवी आणि नवनीत राणा (navneet rana) यांच्यासाठी मातोश्रीचा (matoshree) पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील (amravati) एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडून तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघावे असे आव्हानच मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी राणा दाम्पत्यास दिले आहे. (uday samant latest marathi news)

आमदार रवी राणा (ravi rana) यांनी मातोश्रीवर देखील हनुमान चालीसा लावली पाहिजे असे मत मांडले हाेते. त्यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आज शिवसैनिक अमरावतीत राणा यांच्या घरासमाेर आंदाेलन करीत आहेत.

दरम्यान यावर मंत्री उदय सामंत म्हणाले मुख्यमंत्र्यांवर बाेलणे ही आता फॅशन झाली आहे. त्यामुळे काही लाेकांना वाटते प्रसिद्धी मिळतं. खरं तर जे लाेक अनेक पक्ष साेडून इकड तिकडं फिरतात त्यांनी तर बाेलू नये असा टाेला सामंत यांनी राणा यांना मारला.

काेल्हापूरच्या विजयानंतर माझ्या ट्विटचा निशाणा कुणावरही नाही. फक्त इतर पक्षांची कोल्हापूरच्या निवडणुकीत मते नाहीत का? याच अर्थाने मी ट्विट केल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

विमान अपघातातील वैमानिकाचा फोटो व्हायरल, कॅ. सुमीत कपूर यांचा फोटो असल्याचा दावा

आयकर विभागने छापा टाकला; प्रसिद्ध उद्योजकाने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT