uday samant, eknath shinde, shivsena, ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Kokan News : 'शिवसेना संपविण्याचा 'त्यांनी' घाट घातला हाेता'

रत्नागिरीतील पाऊस परिस्थितीचा आढावा उदय सामंत यांनी आज घेतला.

अमोल कलये

रत्नागिरी : आजही मी शिवसेनेतच आहे. मला भेटणा-या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिका-याला हेच मी सांगत आहे. त्याहूनही सर्वांना माझे एकच सांगणे आहे काेणीही विचलित हाेऊ का. आगामी काळाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील गैरसमज दूर हाेईल असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले.

शिंदे गटात गेल्यानंतर आमदार उदय सामंत (uday samant) पहिल्यांदाच रत्नागिरी (ratnagiri) मतदारसंघात दाखल झाले. पाली येथील निवासस्थानी सामंत यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली हाेती. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी हे सामंत यांच्या निवासस्थानी आले हाेते.

रत्नागिरीतील पाऊस परिस्थितीचा आढावा उदय सामंत यांनी आज घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले मी अजून शिवसैनिकच आहे. माझ्या कार्यालयात आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धवजी तसेच आदित्य यांचा फाेटाे आहे. मी कुणाचाही फोटो काढलेला नाही. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या उठावाला काहीतरी कारण आहे असेही सामंत यांनी नमूद केले.

आजपर्यंत मी कुणावरही टीका केला नाही आणि करणार देखील नाही. अडीच वर्षे रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामाला गती मिळाली आहे असे सांगत सामंत म्हणाले गेल्या अडीच वर्षात घटक पक्षाने किती वाव दिला हे महत्वाचे आहे. त्यांनी शिवसेना (shivsena) संपविण्याचा घाट घातला हाेता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि आपल्या मतदारसंघासासाठी काही कमी केलं नाही असेही सामंत यांनी नमूद केले. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मी मोहिमेत सहभागी झालो याचा मला अभिमान असल्याचे उदय सामंत यांनी सांगत शिवसेनेला डाग लागेल, ती संपेल असं आम्ही काही करणार नाही असं स्पष्ट केले.

दरम्यान टिकेचा स्तर हा सुसंस्कृत असावा असा टाेला सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांना लगावला. दिलेले काढू नये हे संस्कार माझ्यावर झाले आहेत. प्रेमाने बोलवणारे कुणी तरी असावे असं संजय राऊत यांच्या एका विधानाचा सामंत यांनी अप्रत्यक्ष समाचार घेतला.

राजकीय वादात मनोरंजन हवं की नको? निलेश राणे - केसरकर वादावर सामंत यांनी मिश्किल टिपणी केली. दरम्यान झालेला उद्रेक हा शिवसेना फुटली म्हणून होता. उदय सामंत यांनी शिंदे गटातील आमदारांच्या कार्यालयची झालेल्या तोडफोडीवर आणि शिवसैनिक यांच्या दाखल झालेल्या गुन्हावर सामंत यांनी उत्तर देणे टाळले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ९००० होणार? वाचा सविस्तर

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Stray Dog Attack : भटक्या कुत्र्यांची दहशत कधी थांबणार? संभाजीनगरमध्ये चिमुरड्याचे लचके तोडले अन्...

Maharashtra Weather: राज्यावर अवकाळीचं संकट! ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज, ११ जिल्ह्यांना इशारा; बळीराजा चिंतेत

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT