Sea Plane Saam Tv
महाराष्ट्र

Sea Plane: राज्यात ८ ठिकाणावरून सी प्लेन घेणार उड्डाण, स्वस्तात मस्त प्रवास, जाणून घ्या सविस्तर

Udan Sea Plane Aerdomes Service: आता भारतात लवकरच सी प्लेन सेवा सुरु होणार आहे. जलाशयावरुन विमाने उड्डाण घेणार आहेत. दुर्गम भाग जोडण्यासाठी ही नवीन सुविधा सुरु केली जाणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकार लवकरच सी-प्लेन सुविधा सुरु करणार आहे. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले. देशातील दुर्गम भाग हा हवाई मार्गाने जोडला जाणार आहे. यासाठी उडान ५.५ योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सी-प्लेन आणि हेलिकॉप्टर सेवा सुरु केली जाणार आहे.

सी-प्लेन सुविधा (Sea Plane Suvidha)

देशातील जवळपास १५० जलस्थळांवरुन ही सुविधा सुरु केली जाणार आहे. राज्यातील आठ ठिकाणी एअरो ड्रोम (जलाशयातील धावपट्टी) उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला प्रस्ताव दिला आहे.

विमान वाहतूक मंत्रालयाकडून सी प्लेन सुविधा सुरु केली जाणार आहे. यासाठी प्राथमिक टप्प्यात आंध्र प्रदेश, अंदमान-निकोबार, महाराष्ट्र आणि लक्षद्विप या ठिकाणांची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड या कंपनीची विमाने वापरली जाणार आहे

निवडलेल्या ठिकाणावरील नद्या, जलाशयातून हवाई वाहतूक केली जाणार आहे.इंडिगो आणि पवनहंस या कंपन्याही भारतात सी-प्लेन सेवा सुरु करण्यासाठी तयार आहे.

खर्च किती?

सरकारने कमी गॅप फंडिंग देण्यास होकार दिल्याने या जलवाहतूकीचे शुल्क दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असेन. त्यामुळे हे सर्वसामान्य नागरिकांनाही परवडण्याजोगे आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही सेवा देशभरात पोहचली जाईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील या आठ ठिकाणांवरुन उडणार सी-प्लेन

धोम धरण(वाई-सातारा), गंगापूर धरण, खिंडसी धरण, कोराडी धरण, पवना धरण, पेंच धरण, गणपतीपुळे, रत्नागिरी या आठ ठिकाणांवरुन सी प्लेन उड्डाण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT