मंगेश भांडेकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
राज्यात 16 लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन महिला जहाल नक्षलवाद्यांनी गुरुवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. प्लाटून पार्टी कमिटी सदस्य प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई, अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला, असे आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत.
प्रमिला ही 2005 मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून सन 2011 पर्यंत कार्यरत होती. त्यांनतर वैरागड, कोरची दलम मध्ये काम केल्यानंतर 2018 मध्ये कंपनी नं. 04 मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती झाली. तिच्यावर आजपर्यंत 40 गुन्हे दाखल असून 20 चकमक, दोन जाळफोळ आणि 18 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
तर अखिला 2010 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2013 पर्यंत कार्यरत होती. त्यानंतर 2018 मध्ये प्लाटून पार्टी कमिटी सदस्य पदावर तिची बढती झाली. तिच्यावर आजपर्यंत एकूण 07 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 02- चकमक, 04- खून, व 01- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने दोघींवरही प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
दरम्यान, तपात घडवण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं. मंगळवारी भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून दोघांवरही शासनाने तब्बल दहा लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. ॲक्शन टीम कमांडर रवी मुरा पल्लो व दोबा कोरके वड्डे (पार्टी सदस्य, भामरागड दलम), असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.