Nashik News  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : दहावीची परीक्षा द्यायला निघाले अन् वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! अंगावर काटा आणणार घटनाक्रम

या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Accident News : सिन्नर घोटी हायवेवर दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. आगासखिंड येथील माध्यमिक शाळेत दहावीत शिकणारे विद्यार्थी परीक्षेसाठी पांढुर्ली येथील परीक्षा केंद्राकडे जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.

शुभम रामदास बरकले वय- १४ आणि दर्शन शांताराम आरोटे वय - १४ अशी दोघांची नावं आहेत. हे दोघे जण दुचाकीवरून परीक्षा देण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस टँकरने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या भीषण अपघातात (Acciddent) दोघांचा ही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरलीय.

दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा आजपासून सुरू

दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा (Exam) आजपासून सुरू झाली आहे. या परीक्षेची सुरुवात प्राथमिक भाषेच्या पेपरने होणार आहे. २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. तर विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटचे १० मिनिटं वाढवून देणार असल्याचंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

या परीक्षा ९ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहेत. या परिक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी देणार परीक्षा. यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी तर ७ लाख ३३ हजार ०६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा देणार आहेत. यावर्षी १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची चौकशी, VSIचं ऑडिट की अजितदादा टार्गेट?

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ बस आणि कारचा अपघात

Bihar Elections : लाडक्या बहि‍णींना २५०० रुपये, मोफत वीज, सरकारी नोकरी; इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

उपराज्यपालांच्या नातवाची आत्महत्या; कानपूरमध्ये सापडला मृतदेह,चिठ्ठीतून उलगडणार सत्य

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT