Breaking News Saam tv
महाराष्ट्र

Satara Breaking News: विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण; २ पाेलिसांसह होमगार्ड निलंबित

या मारहाणीच्या घटनेचा विद्यार्थी आज निषेध नाेंदवित आहेत.

ओंकार कदम

सातारा : शिरवळ (shirwal) येथील विद्यार्थ्यांना (students) झालेल्या मारहाण प्रकरणात सातारा (satara) पाेलिस (police) दलातील दाेन पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड निलंबित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पाेलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अजित बोऱ्हाडे यांनी साम टीव्हीला दिली. (satara latest marathi news)

शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना चार पोलिसांनी बेदम मारहाण केली असा विद्यार्थ्यांचा आराेप आहे. दरम्यान याबाबत वरिष्ठ पाेलिस अधिकारी बोऱ्हाडे म्हणाले संबंधित वसतीगृहात विद्यार्थ्यांचा रात्री गाेंधळ सुरु असताे अशी स्थानिकांची तक्रार हाेती. त्याची शहनिशा करण्यासाठी २ पाेलिस कर्मचारी आणि हाेमगार्ड गेले हाेते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आम्हांला पाेलिसांनी मारहाण केल्याचे म्हटलं आहे. त्याची काही छायाचित्र समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहेत.

एसपींनी स्वतः याबाबत दाेन वरिष्ठ अधिकारी यांनी अहवाल देण्यास सांगितलं आहे. दरम्यान चाैकशी अहवाल आल्यानंतर याेग्य ती कार्यवाही केली जाईल. तूर्तास दाेन पाेलिस कर्मचारी आणि हाेमगार्ड यांनी निलंबित केल्याचे बाे-हाडे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye cancer symptoms: ही लक्षणं दिसू लागली तर समजा डोळ्यांच्या कॅन्सरची होतेय सुरुवात; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन सभा, हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने सभेला उशीर

Paithani Price: महिलांना झटका! पैठणीची किंमत वाढली; VIDEO

Ajit Pawar Death : दादांची शप्पथ! …तर त्याच्या घरात चिता जाळायला कुणी शिल्लक राहणार नाही, आमदाराचा थेट इशारा

Mumbai Road Trip: लोणावळा-खंडाळा झाले जुने; मुंबईजवळची 8 हिडन ठिकाणं पाहून थक्क व्हाल, पार्टनसोबत रोड ट्रिप करा एन्जॉय

SCROLL FOR NEXT