nandurbar news, nandurbar accident news, police saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News : डोंगरगाव रस्त्यावरील कार अपघातात शहादा तालुक्यातील युवक ठार

नंदूरबार जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डोंगरगाव रस्त्यावर झालेल्या कारच्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. हा अपघात इतका भीषण हाेता की कारचा संपुर्णत: चक्काचूर झाला आहे. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. त्यानंतर एका झाडाला जाऊन जोरदार धडकली. त्यामुळे कारचे माेठे नुकसान झाले. पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार या अपघातात दाेन जण ठार झाले आहेत. हे दोघे शहादा तालुक्यातील रहिवासी आहेत.

घटनास्थळ आणि पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अमरसिंग धनसिंग गिरासे आणि विजय श्रावण सोनवणे हे दाेघे युवक कारने डोंगरगावकडून शहाद्याकडे निघाले हाेते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने तीन पलटी घेतल्या तसेच रस्त्याच्या विरुद्ध दिशेला झाडाला जबरदस्त ठोकर मारली. यामध्ये अमरसिंग (दराने रोहाने हल्ले मुक्काम लोणखेडा) व विजय याचा मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT