Dharashiv road accident Saam tv
महाराष्ट्र

भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली; चहा पित बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू

Dharashiv road accident : धाराशीवच्या उमरगामध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Vishal Gangurde

धाराशिवमध्ये भरधाव कार चहाच्या हॉटेलमध्ये घुसली

हॉटेलमध्ये चहा पित बसलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू

अपघातानंतर स्थानिक मदतकार्याला धावले

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिवच्या उमरगा शहरातील बायपास रोड परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. तुळजापूर येथे देवीचे दर्शन करून हैदराबादकडे परत जात असताना कारचा भीषण अपघात घडला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या चहाच्या हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

उमरगा येथे झालेल्या भीषण अपघातात हॉटेलमध्ये चहा घेत बसलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कार अतिवेगात असल्यामुळे चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे कार थेट हॉटेलमध्ये घुसली.

अपघात इतका भीषण होता की, परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. तसेच दोघांचे मृतदेह रुग्णालयात पाठवले. या अपघातात दोघांच्या मृत्यूने उमरगा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूरच्या पुणे-नगर रोडवर भीषण अपघातात झाला. या अपघातात ४४ वर्षीय महेश भगत यांचा अपघातात मृत्यू झाला. रात्री २ वाजेच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरून एका समोरील दुभाजकावर वळण घेताना त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या १७ सीटर वाहनाची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकी चालक अक्षरशः काही अंतरावर रस्त्याने घासत समोर गेला. अपघाताची ही घटना सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ जखमींना हॉस्पिटमध्ये दाखल कले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AhilyaNagar News: आई-बहिणीवरून शिवी द्याल तर बसेल दंड; कोळगावच्या निर्णयाची राज्यभरात चर्चा

तब्येत बिघडली, मंचावरून खाली पडले; रुग्णालयात उपचाराअभावी भाजपच्या महामंत्र्याचे निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

LPG Gas Booking: गॅस सिलेंडर मिळत नाही? घरबसल्या करा या 4 सोप्या पद्धतीने करा झटपट बुकिंग

Maharashtra Live News Update : 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Good News: मुंबईवरून नवी मुंबईला जा सुसाट, ४० मिनिटांचा प्रवास फक्त १० मिनिटात; सरकारचा जबरदस्त प्लान

SCROLL FOR NEXT