Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : बीड-अहमदनगर मार्गावर दोन भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू, काही जण जखमी

Beed News : बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका अॅम्बुलन्सला भीषण अपघात झाला आहे. तर दुसरा अपघात मुंबईहून बीडकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला झाला आहे.

विनोद जिरे

Beed News :

बीडमध्ये महामार्गावर झालेल्या दोन अपघातांत १० जणांचा मृ्त्यू झाला आहे. बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका अॅम्बुलन्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरा अपघात मुंबईहून बीडकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला झाला आहे. ट्रव्हल्स उलटून झालेल्या या अपघतात एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीत दोलावडगाव येथे एका भरधाव अॅम्बुलन्सने ट्रकला मागच्या बाजून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

अपघातात अॅम्बुलन्स चालक भरत सिताराम लोखंडे (35 वर्ष), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय 35 वर्ष) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे मुंबईहून बीडकडे जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला अपघाता झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला आहे. आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील आष्टा फाटाजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर कल्याण स्टेशनवर सुरक्षा यंत्रणा सतर्क, दुसऱ्या दिवशीही कसून तपासणी

Wednesday Horoscope : अडचणीतून वाट काढावी लागणार; वृश्चिकसह ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Delhi Car Blast: दिल्ली स्फोटाचं पाक कनेक्शन उघड? डॉक्टर शाहीना हल्ल्याची मास्टरमाईंड?

महायुती फुटली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? दोन्ही NCP आवळणार भाजपविरोधात वज्रमूठ?

Solapur Municipal Corporation: निवडणूक आरक्षण जाहीर; दिग्गजांना धक्का,आरक्षणामुळे वाढल्या अडचणी

SCROLL FOR NEXT