Accident Saam TV
महाराष्ट्र

Accident: नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, कार चालक फरार

अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला असून जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) भीषण अपघातात दोन ठार झाले आहेत. हा अपघात नागपूर - तुळजापूर महामार्गावर झाला आहे. हदगाव तालुक्यातील मानवाडी फाट्याजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास कार आणि अ‍ॅक्टिव्हाचा समोरासमोर झालेल्या भीषण धडकल्याने मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला असून जखमीला पुढील उपचारासाठी हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

कार हदगावच्या दिशेने तर अॅक्टीव्हा वारंगा फाट्याकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातात अ‍ॅक्टिव्हाच्या समोरचा भाग चक्काचूर झाला असून अपघाताच होताच कार चालकाने कार घटनास्थळावर ठेवून फरार झाला आहे. पोलिसांनी (Police) घटस्थळाचा पंचनामा केला आहे मात्र, अपघातात मृत्यू झालेल्यांची अद्याप ओळख पटली नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अस्सल गावरान पद्धतीची 'केना रानभाजी' पावसाळ्यात घरच्या घरी बनवा |Kena Ranbhaji Recipe

Hypertension: ब्लड प्रेशर अचानक वाढलं तर रूग्णाने किती पाणी प्यायलं पाहिजे?

Maharashtra News Live Update: राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा!...

Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा कुरकुरीत गवार; झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT