Viral News Saam TV
महाराष्ट्र

Viral News:दोन मित्रांना जेवण बनवणे पडले महागात; फोडणी देताना संपूर्ण टोपाला आग

फोडणी तयार झाल्यावर त्याचा मित्र टोपाचे झाकण उघडतो आणि दुसरा लगेच तयार केलेली फोडणी त्यात टाकतो.

साम टिव्ही ब्युरो

Viral News: कधीतरी चुकून किचनमध्ये गेल्यावर जेवण बनवताना सर्वांचीच फजीती होते. मुलगी असो अथवा मुलगा घरापासून दूर रहायला गेल्यावर प्रत्येकालाच जेवण बनवावे लागते. अशात सोशल मीडियावर जेवण बनवतानाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुलांनी जेवण बनवताना अशी काही फोडणी दिली की, संपूर्ण टोपाला आग लागलेली दिसत आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायर होत आहे. व्हिडिओमध्ये दोन मुलं जेवण बनवताना दिसत आहेत. शेजारी एका मोठ्या टोपात डाळ ठेवली आहे. तर एक तरुण गॅसवर फोडणी देण्यासाठी तेल तापवत आहे. फोडणी तयार झाल्यावर त्याचा मित्र टोपाचे झाकण उघडतो आणि दुसरा लगेच तयार केलेली फोडणी त्यात टाकतो.

आता फोडणी दिली की मस्त जेवायला बसू असा विचार करणाऱ्या या मुलांची चांगलीच फजीती होते. फोडणी देत असताना तेल इतके तापते की, टोपात टाकल्यावर संपूर्ण टोपभर आग पसरते. त्यामुळे दोघेही घाबरून मागे पळतात. ही आग इतकी मोठी असते की एका क्षणासाठी स्फोट झाला आहे असे वाटते. सोशल मीडियावर फ्लर्टींग बॉय या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओला ( Video) आता पर्यंत १.४ मिलियन व्ह्यूव्ज मिळाले आहेत. तसेच ८५ हजार लाईक्सचा वर्षाव यावर करण्यात आला आहे. एका युजरने यावर कमेंटकरत लिहिले आहे की, जर फोडणी देता येत नसेल तर या भावाकडून शिकून घ्या. तसेच अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी पाठवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: उन्हाळ्यात चेहरा डल आणि काळा पडलाय? मग वापरा ५ मिनिटांत तयार होणारा हा फेसपॅक

मोठी बातमी! अखेर LPG ला पर्याय मिळाला, पुण्यात नव्या गॅसची निर्मिती

Maharashtra Live News Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Skin Care : १० मिनिटांत पायांचा काळपटपणा होईल गायब, वापरा फक्त या ३ स्टेप्स

Ration Card: केंद्र सरकारने 'रेशन'बाबत घेतला मोठा निर्णय, राज्यांना थेट पत्र पाठवलं

SCROLL FOR NEXT