Kalyan Fire News  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Fire News : कल्याणमध्ये दिवसभरात आगीच्या दोन घटना; घरात कोणीही नसताना...

एका घटनेत घर जळून खाक झाले तर दुसऱ्या घटनेत लाखोंच्या वायरी जळून खाक झाल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan Fire News : कल्याणमध्ये दिवसभरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. या लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं आहे . या दोन्ही घटनेत जिवीत हानी झालेली नसली तर मोठी वित्तहानी झाली. एका घटनेत घर जळून खाक झाले तर दुसऱ्या घटनेत लाखोंच्या वायरी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या दोन्ही आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

कल्याण (Kalyan) पूर्वेतील तीसगावमधील अक्षय गायकवाड यांच्या घराला सव्वा सहा वाजनाच्या सुमारास आग (Fire) लागली. या घराच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्याने परिसरात घबराट पसरली होती. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगीत गायकवाड यांचे घर व घरातील सामान जळून खाक झाले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागली तेव्हा गायकवाड कुटुंबिय घराबाहेर होते. त्यामुळे याठिकाणीही जीवित हानी टळली आहे.

दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर याच दरम्यान लोकग्राम परिसरातील गवताला सायंकाळच्या सुमारास आग लागली. या गवता शेजारी जीओचा मोबाईल टॉवर आहे. त्याठिकाणी जीओ कंपनीची केबल होती.

आगीत ही केबल जळून खाक झाली आहे. या घटनेत जिवीतहानी झालेली नाही. ही आग समाजकटंकांनी लावली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT