नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू  
महाराष्ट्र

पुराच्या पाण्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; देगलूर व उमरी तालुक्यातील घटना

Pralhad Kamble

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुरात वाहून गेल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देगलूर व उमरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला होता. Two -farmers- killed- in- flood- waters- Incidents- in- Deglur- and- Umri -tahsil

देगलूर तालुक्यातील लेंडी नदी पात्रात एकाचा तर उमरी तालुक्यात एका लहान नाल्यात दुसऱ्या शेतकऱ्याचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला. या घटना ता. २५ जुलैच्या दरम्यान घडल्या. मागील आठवड्यात जिल्हाभरात सर्वत्र जोरदार पावसाची सुरुवात झाली होती. या पावसात लहान- मोठे नदी नाले तुडुंब भरुन वाहत आहेत.

हेही वाचा - घरासमोरील कचरा जाळत असताना इरफान शेख भाजला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना मात्र मृत्यू झाला.

यातच देगलूर तालुक्यातून वाहणाऱ्या लेंडी नदीला मोठा पूर आला होता. रामा विठ्ठल बेलकर (वय ६५) राहणार तमलुर (ता. देगलूर) येथील शेतकरी हा आपल्या शेतातून घराकडे ता. २४ जुलैच्या सायंकाळी परत येत होता. यावेळी तो लेंडी नदीपात्रातून जात असताना पुरात्या पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह ता. २५ जूलै रोजी सापडला. या प्रकरणी चंद्रकांत रामा बेलकर यांच्या माहितीवरुन देगलूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसर्‍या घटनेत नामदेव नागोबा झुंजारे ( वय ४५ ) राहणार शेलगाव ( ता. उमरी ) हा शेताकडून घराकडे येत असताना रस्त्यातील एका लहान नाल्याया वाहून गेला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी ( ता. २५ ) जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. विकास नामदेव झुंजारे यांच्या माहितीवरुन उमरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस अंमलदार श्री सरोदे करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

Today's Marathi News Live: सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

Akola News: मंदिरासाठी खोदकाम करताना जमिनीत आढळली २०० वर्षांपेक्षा जुनी इमारत; भिंतींवर होता 'राम' नामाचा उल्लेख

Akola Crime News : अकोल्यात गुरूच्या नात्याला कलंक; कुस्ती प्रशिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

SCROLL FOR NEXT