Nagpur : गंगा जमुना वेश्यावस्तीत अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी दोन भुयार! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

Nagpur : गंगा जमुना वेश्यावस्तीत अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी दोन भुयार!

नागपूर शहरातील बदनाम वारंगणांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या गंगा जमुना येथे दोन भुयार मिळून आली आहेत. पोलिसांच्या कारवाई दरम्यान अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी या भुयारांचा वापर केला जात होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- मंगेश मोहिते

नागपूर :- नागपूर शहरातील बदनाम वारंगणांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या गंगा जमुना येथे दोन भुयार मिळून आली आहेत. पोलिसांच्या कारवाई दरम्यान अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी या भुयारांचा वापर केला जात होता. एका राजस्थान येथील मुलीची तिच्या नातेवाईकांनी विक्री केली होती. एका ग्राहकांच्या मदतीने त्या मुलीने गंगा जमुना वस्तीतून पळ काढला होता, त्यानंतर त्या मुलीने लकडगंज पोलिसांना या भुयाराची माहिती पोलिसांना दिली, ज्याच्या आधारे पोलिसांनी भुयार शोधून काढले आहेत.

हे देखील पहा :

नागपुरातील वारंगणांची वस्ती असलेल्या गंगा जमुना परिसर म्हणजे नागपुरातील सगळ्यात गरम मुद्दा आहे. या वस्तीला पोलिसांनी सील केल्या पासून या ठिकाणी अनेक आंदोलन आणि प्रदर्शन सुद्धा झाली. मात्र, या वस्तीतील एक आतली बाजू सुद्धा आज एका जुन्या केस चा तपास पोलीस करत असताना पुढे आली ती म्हणजे या ठिकाणी दोन भुयार मिळून आले. वारंगणावर पोलीस जेव्हा कारवाई करण्यासाठी जायचे त्यावेळी मुलींना लपवून ठेवण्यासाठी या भुयारांचा वापर केला जायचा.

वेश्याव्यवसायात मुलींना ओढल्यानंतर त्यांच्यावर अमानवी अत्याचार करण्यासाठी सुद्धा या भुयारांमध्ये मुलींना डांबून ठेवले जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस जेव्हा आज एका जुन्या केस च्या तपास कामात घटनास्थळी पोहचले त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. या ठिकाणी जेव्हा पोलीस पोहचले तेव्हा मात्र या ठिकाणचा नजारा पाहण्या सारखा होता अगदी छोटे छोटे बोगदे ज्या ठिकाणी ज्यात मुलींना लपविल जायचं यात किती वेदना त्यांना होत असेल? पोलिसांनी आता या ठिकाणी आणखी अशी काही स्थळ आहेत का याचा शोध सुरू केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कौटुंबिक वादातून पत्नीची पतीकडून हत्या; परिसरात खळबळ|VIDEO

Asambhav: प्रेम आणि रहस्यांनी भरलेला 'असंभव'; मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि सचित पाटील दिसणार थरारक रुपात

Wednesday Horoscope: 'या' ४ राशींसाठी बुधवार दिवस सोन्यासारखा; वाचा खास राशीभविष्य

Sara Ali Khan: सारा अली खानचा झक्कास लूक, नजरेने सौंदर्याला लावले चारचाँद

Uddhav and Raj Thackeray Together Again: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, कधी अन् कुठे? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT