drown saam tv
महाराष्ट्र

Bhandara: कालव्यात बुडून काका- पुतण्याचा मृत्यू; आसलपानी गावावर शोककळा

या घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अभिजित घोरमारे

भंडारा : जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेल्यानंतर कालव्यात उतरून हातपाय धुणे काका पुतण्याच्या जीवावर बेतल्याची घटना भंडारा (bhandara) जिल्ह्यात घडली आहे. तुमसर तालुक्यातील आसलपानी येथील कारली लघुकालव्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. साहील राजेश कोकोडे (वय १२) आणि हौसीलाल हिरदेराम कोकोडे (वय २४) दोघेही (रा. आसलपानी ता. तुमसर) अशी मृतांची नावे आहेत. (bhandara latest marathi news)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : साहील व हौसीलाल जंगलात (jungle) मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. घराकडे परतताना वाढत्या तापमानामुळे दाेघेही घामाने भिजले हाेते. हातपाय धुण्यासाठी दोघेही कारली लघुकालव्यात उतरले. त्यावेळी त्यांचा तोल गेल्याने दोघेही पाण्यात पडले.

तेथे वाचवण्यासाठी त्यांनी हाका मारल्या मात्र कुणीही नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी (villagers) घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

साहील हा येरली येथील आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. तो आश्रमशाळेत जाणार होता. त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने या घटनेने आसलपानी गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT