crocodile file photo from krishna river
crocodile file photo from krishna river 
महाराष्ट्र

'कृष्णे'त दोन मगरींचा मुक्त वावर; पोहणाऱ्यांची उडाली भंबेरी

विजय पाटील

सांगली : सांगली येथील कृष्णा नदी पात्रात मागरीचा वावर आहे असे आपण सातत्याने पाहत आलाे आहाेत. आज (साेमवार) पुन्हा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या काही युवकांना मगर दिसली आणि त्यांची घाबरुगुंडी उडाली. two-crocodile-found-in-krishna-river-sangli-marathi-news-sml80

कृष्णा नदीत आज काही युवक नेहमीप्रमाणे पाेहण्यास गेले हाेते. पाेहत असताना त्यांना काही अंतरावर मगर दिसली. त्यामुळे त्यांची भितीने गाळण उडाली. हे युवक काठानजीक पाेहत असल्याने त्यांनी तातडीने नदी बाहेर पळ काढला.

नदीच्या बाहेर येऊन पाहतात तर काय चक्क दोन मगरी कृष्णेत मुक्तपणे संचार करीत हाेत हाेत्या. घाबरलेल्या युवकांनी नदीमध्ये मुक्त विहार करणाऱ्या या दोन्ही मागरींना आपल्या माेबाईलमध्ये कैद केले.

त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी देखील या मगरींचे व्हिडीओ काढले. तब्बल दहा ते १२ फुटांच्या या मगरी पाण्यात विहार करीत हाेत्या. दरम्यान कृष्णा नदी पात्रात सध्या काेणीही पाेहण्यास जाऊ नये असे आवाहन युवकच करु लागले आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

Rupali Ganguly: परी म्हणू की अप्सरा; रूपालीचे आउटफिट पाहून पडाल प्रेमात

Health Tips : डाएट आणि जीम न करता वजन कमी करायची इच्छा आहे? फक्त ६ टिप्स फॉलो करा

Carrot Juice: रोज सकाळी प्या गाजराचा रस, निरोगी राहाल

Shivali Parab : शिवाली तुच आता माझ्या हृदयाचे हार्टबिट वाढवलेत...

SCROLL FOR NEXT