भंडारा: भंडाऱ्यात रात्रीच्या वेळेत संशयितरित्या फिरणाऱ्या दोन युवकांची चौकशी केली असता त्यांच्याकडे देशी कट्टा आढळल्याची घटना घडली. या प्रकरणी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपीला अटक केली आहे (Two arrested with pistal in Bhandara).
अमन ओमप्रकाश ब्रह्मो (22) आणि नीतेश भोजलाल पटले (21) दोघे राहणारे कोसमी, जिल्हा बालाघाट अशी अटक (Arrest) केलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी कट्ट्यासह चोरीची दुचाकी सुद्धा जप्त केली आहे.
भंडारा जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत असून या अंतर्गत भंडारा शहरातील शास्त्री चौक ते सिंधी कॉलनी मार्गावरील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटो रिपेअरिंग सेंटरजवळ दोन युवक संशयितरित्या फिरताना आढळले.
याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचत दोघांची विचारणा केली असता दोघेही तरुण उत्तर दिल्यावर तपासणी केल्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेली एक देशी कट्टा, चोरीची दुचाकी इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समयसूचकता दाखविल्याने दोन्ही तरुणांना वेळीच पकडण्यात यश आले असून त्यांच्या ताब्यातून अवैधरित्या वापरात असलेला गावठी बनावटीचा देशी कट्टा किंमत सात हजार रुपये दुचाकी साहित्याची किंमत 47 हजार 265 रुपये सांगण्यात येत आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध भंडारा (Bhandara) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेनंतर मोठी घातपाताची घटना टळली आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.