बीडमध्ये एकाच दिवशी दोन 16 वर्षीय मुलींनी केली आत्महत्या! Saam Tv
महाराष्ट्र

बीडमध्ये एकाच दिवशी दोन 16 वर्षीय मुलींनी केली आत्महत्या!

एकीने घेतला गळफास तर दुसऱ्या मुलीने मारली विहीरीत उडी !

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीड Beed जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काल बीडच्या नेकनूरमध्ये एकीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर केज तालुक्यातील मस्साजोग येथे दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा-

रूपाली मुळे (वय -16 रा. नेकनूर) व कोमल गोविंद गायकवाड (वय 16 रा. मस्साजोग) अशी आत्महत्या केलेल्या दोन मुलींची नावे आहेत. तर या दोन्ही मुलींनी आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झालं नसून याप्रकरणी नेकनूर व केज पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद झाली आहे.

दरम्यान, सध्या तरूण-तरुणींच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने, तरूण पिढीत निर्णय क्षमता आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर, वैचारिक क्षमता देखील कमी होत चालल्याने क्षणभराचाही विचार न करता थेट आत्महत्येचा पर्याय सध्याची तरुण पिढी निवडत आहे. त्यामुळं त्यांना योग्य वयात योग्य मार्गदर्शनाची मिळण्याची गरज आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : कबुतरांना दाणे टाकणे महागात पडणार; महापालिका थेट आकारणार दंड

Maharashtra News Live Update: महापालिकेची टिंगरे नगर रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई

नोकरदारांसाठी मोठी अपडेट! EPFO मध्ये अतिरिक्त रक्कम भरण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या काय होऊ शकतो बदल

Hair Loss In Men: केस झपाट्याने गळतायत? वेळीच करा या टेस्ट, शरीरातील गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण!

Back Pain : कॅन्सरपेक्षा कंबरदुखी खतरनाक, नेहमीच्या 'या' ५ सवयी ठरतायत धोकादायक

SCROLL FOR NEXT