Senior Police Officer Tushar Patil, Commandant of SRPF Group-5 Daund, passed away at the age of 45 during treatment in Pune. saam tv
महाराष्ट्र

बड्या पोलीस अधिकाऱ्याचे निधन, महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा

Tushar Patil SRPF Group 5 Daund Death Reason: एसआरपीएफ गट-5 दौंडचे समादेशक तुषार पाटील यांचे वयाच्या 45 व्या वर्षी निधन झाले आहे. पुण्यात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे.

Omkar Sonawane

राज्य राखीव पोलीस दल एसआरपीएफ गट-5, दौंडचे समादेशक म्हणून कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुण्यातील रबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आठ वर्षांपूर्वी तुषार पाटील यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यावेळी त्यांच्या वडिलांना त्यांना किडनी दान केली होती. अलीकडे पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान एसआरपीएफच्या पेपरफुटी प्रकरणातही त्यांचे नाव समोर आले होते, ज्यामुळे ते चर्चेत आले होते. जळगाव येथील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोल्हापूर यथे नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षक पदावरून दौंड येथे समादेशक तथा पोलीस अधीक्षक म्हणून तुषार पाटील यांची बदली झाली होती, तुषार पाटील यांनी पोलीस अधीक्षक म्हणून कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई येथे वाहतूक विभागात सेवा केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे लोहमार्ग पोलीस दल येथे काम पाहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT