APMC news Saam TV Marathi
महाराष्ट्र

APMC news : हळदीचा प्रश्न पेटला! सर्वात मोठं मार्केट ४ दिवस बंद; खरिपाच्या तोंडावर बळीराजा मेटाकुटीला

Turmeric price today Maharashtra : हिंगोलीतील सर्वात मोठी हळद बाजार समिती ४ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

Namdeo Kumbhar

Hingoli turmeric market closure impact on farmers : दिवसाला २५०० क्विंटल हळदीची उलाढाल होणाऱ्या हिंगोली बाजार समितीवर आज बंदची वेळ आली आहे. बाजार समितीच्या यार्डमध्ये शेड नसल्याने आणि व्यापाऱ्यांनी माल न उचलल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शेतात राबून पिकवलेली हळद विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला आता रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे. पेरणीसाठी पैसे कोठून आणायचे? असा सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

"मराठवाड्यातील हळद खरेदीचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता बंद करण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल बाजार समितीच्या यार्डमधून वेळेत उचलला नसल्याने, शेतकरी आपली हळद न विकताच घरी परतले आहेत.

या बाजार समितीमध्ये दररोज सरासरी २५०० क्विंटल हळदीची आवक होते; मात्र खरेदी झालेला माल व्यापारी वेळेवर उचलत नसल्याने पुढील चार दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीच्या रिकाम्या जागेत शेड उभारण्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधींमार्फत शासनाकडे अनेक वर्षांपासून निधीची मागणी करत आहे.

मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हिंगोलीतील शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेली हळद विकण्याऐवजी ती पुन्हा घरी नेऊन साठवून ठेवावी लागत असल्याने, खरिपाच्या पेरणीची तयारी कशी करायची? असा संतप्त सवाल शेतकरी आता लोकप्रतिनिधी आणि सरकारला विचारत आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled Egg Peeling: उकडलेले अंडे सोलताना तुटतेय? 'या' सोप्या ट्रिकने काही सेकंदात निघेल कवच

Typing Side Effects : कॉम्प्युटरवर तासन्‌तास टायपिंग करणं ठरू शकतं महागात, शरीराला जखडतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी शेती पिके करपली

Gold Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा दर बदलले; 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहा

एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो?

SCROLL FOR NEXT