Tuljapur Tulja Bhavani Mandir x
महाराष्ट्र

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

Tulja Bhavani Mandir : तुळजापूर मंदिराचा गाभारा पाडण्यात येणार असल्याचा खळबळजनक आरोप आव्हाडांनी केलाय.. त्यावरुन मंदिर जीर्णोद्धाराचा वाद पेटलाय... मात्र हा वाद नेमका कुठून सुरु झाला? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

Tuljapur : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजा भवानीच्या मंदिराचा जीर्णोद्धरावरुन वादाची ठिणगी पडलीय.. तर त्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी जीर्णोद्धाराच्या नावाखाली तुळजा भवानीच्या मंदिराचा गाभाराच पाडण्याचं पाप केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप केलाय...त्यामुळे जीर्णोद्धाराच्या वादाचा भडका उडालाय.

एवढंच नाही तर जितेंद्र आव्हाडांनी तुळजापूर गाठत तुळजा भवानी मंदिराची पाहणी केलीय.. तर ऐतिहासिक राजे शहाजी महाद्वार पाडण्यात येणार असल्याचं समजल्यानंतर आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय...

मात्र मंदिर जीर्णोद्धाराचा वाद नेमका काय आहे? पाहूयात...

  • मंदिराचा गाभारा आणि पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार

  • मंदिराच्या विकास आराखड्यात घाटशीळ येथे दर्शन मंडप उभारण्याचा प्रस्ताव

  • मंदिराला सोन्याचा कळस बनवण्याचा विचार

  • राजे शहाजी महाद्वार पाडण्यात येण्याचा आरोप

  • गाभाऱ्याच्या दुरुस्तीमुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला धक्का बसण्याची शक्यता

जितेंद्र आव्हाडांनी तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीला विरोध केल्याने भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडी अडवली आणि तुळजापुरात राडा पाहायला मिळाला... तर दुसरीकडे तुळजा भवानी मंदिराच्या जीर्णोद्धारावरुन वादाचा भडका उडाल्याने अखेर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतलीय...

तुळजा भवानी मंदिर प्राचीन असल्याने त्याची देखभाल पुरातत्व खात्याकडून करणं गरजेचं आहे.. मात्र मंदिराच्या जीर्णोद्धाराआडून केल्या जाणाऱ्या ड्रील मशिनच्या वापरामुळे गाभाऱ्याला तडे जात आहेत..तर तुळजा भवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरत असल्याचं दिसतंय. त्यामुळे जीर्णोद्धाराला होणारा विरोध पाहता मंदिर प्रशासन जीर्णोद्धाराचा मुद्दा गुंडाळून ठेवणार की जनरेट्याच्या विरोधात जाऊन जीर्णोद्धार करणार? याकडे देशभरातील भाविकांचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणी काय खावं हे सरकारनं सांगू नये; मांसबंदीवर राज ठाकरेंचा हल्लाबोल|VIDEO

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! चेक क्लिअरन्सच्या नियमांत केला बदल

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

SCROLL FOR NEXT