tuljapur police arrests youth in fake app and website case of tuljabhavani devi sml80 saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Temple Fake Website : तुळजाभवानीचे बनावट अ‍ॅप अन् वेबसाईट उघडकीस, भक्तांची लूट; एकावर गुन्हा दाखल

वेबसाईटवर देवीची प्रतिमा व लोगो देखील विना परवाना वापरुन मंदिर संस्थानची फसवणूक करण्यात आली आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljapur News :

तुळजाभवानी मंदीर संस्थानची कसलीही परवानगी न घेता देवीच्या नावाशी साधर्म्य असलेले अ‍ॅप आणि वेबसाईट तयार करुन भाविकांची लूट सुरु आहे. या प्रकरणी पाेलीसांनी एका विराेधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पाेलीस कसून चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार तुळजापुर येथील विजय सुनील बोदले याने तुळजापूर मंदिर संस्थानची परवानगी न घेता तुळजाभवानी देवीच्या नावाशी साधर्म्य असलेले अ‍ॅप्लिकेशन बनविले. तसेच वेबसाईट ही तयार केली. या माध्यमातून तो भाविकांशी संपर्क करून वेगवेगळ्या पुजेसाठी पैसे गोळा करीत असे.

त्याने वेबसाईटवर देवीची प्रतिमा व लोगो देखील विना परवाना वापरुन मंदिर संस्थानची फसवणूक केली आहे. ही बाब मंदिर संस्थानच्या निदर्शनास आली. याबाबत मंदिर संस्थानने पाेलीसांत तक्रार केली. या तक्रारीवरून तुळजापूर पोलीसांनी विजय सुनील बाेदले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanda Ramtirthkar: गुलाबी आँखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया...

'आमचा उपचार माहितच असेल'....; मराठीविरोधात भूमिका घेणाऱ्यांविरुद्ध मनसेची कडक भूमिका

Maharashtra News Live Update: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक: दुपारी 3 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान

MCA awards ceremony: MCA अवॉर्ड्समध्ये शार्दुल-सिद्धेशचा दबदबा, आयुष म्हात्रेसह वर्ल्ड कप स्टार्सचा सन्मान

Nagpur : अति व्यायामामुळे फाटली मेंदूतील रक्तवाहिनी; गोल्डन अवरमध्ये चमत्कार घडला, डॉक्टरांनी वाचवला तरुणाचा जीव

SCROLL FOR NEXT