tulja bhavani mandir sansthan gold theft case devotees demands narco test
tulja bhavani mandir sansthan gold theft case devotees demands narco test  saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : तुळजाभवानी दागिने चोरी प्रकरण; 4 महिन्यांपासून आराेपी माेकाट, नार्को टेस्टची मागणी

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

तुळजाभवानी मातेच्या (tuljabhavani) मौल्यवान दागिने गायब प्रकरणी नार्को टेस्ट करण्याची मागणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व ॲड.शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra News)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या अतिप्राचीन दागदागिने, मौल्यवान वस्तू व 71 पूरातन नाणी गायब झाले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीची नार्को टेस्ट करून भाविकांना (devotees) न्याय द्यावा, अशी मागणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व ॲड.शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्य सरकारला नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रकरणी पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे दागिन्यांच्या चाेरी प्रकरणातील आरोपी 4 महिन्यांपासून पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे आरोपींचा शोध घेऊन नार्को टेस्ट करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Loksabha Election: मतदान ड्युटी करताना पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू

Maharashtra Lok Sabha Voting Live: नाशिकमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली, 61 टक्के मतदानाची नोंद

Special Report | उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदा पंजाला तर राज ठाकरेंचं 19 वर्षांनी धनुष्यबाणाला मत

KKR vs SRH: हैदराबाद की कोलकाता; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कोणाला मिळवून देणार फायनलचं तिकीट?

Special Report | 12वीचा निकाल कुठे पहायचा? हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

SCROLL FOR NEXT