Tukaram Mundhe saam tv
महाराष्ट्र

Fact Check : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली? स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

Tukaram Mundhe Transfer News : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची एफडीए आयुक्तपदावरून बदली झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे बदलीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

Namdeo Kumbhar

MPSC मधील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांच्या तपासासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी IAS तुकाराम मुंढे यांच्यावर सोपवण्यात आली. ही घोषणा होताच तुकाराम मुंढे यांची एफडीए आयुक्तपदावरून अन्य विभागात बदली करण्यात आली आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण नेमकं सत्य काय होणार? तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Is Tukaram Mundhe transferred from FDA commissioner post)

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीआरतर्फे भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरोधात राज्यभर जोरदार कारवाया सुरू आहेत. त्यांच्याकडे फक्त MPSC पेपरफुटी प्रकरणातील चौकशीच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची कुठेही बदली झालेली नाही. तुकाराम मुंढे यांनी पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर (एक्स/ट्विटर) पोस्ट करत स्पष्ट केले आहे की, त्यांची एफडीएच्या आयुक्तपदावरून कोणतीही बदली झालेली नाही.

Tukaram Mundhe Transfer News

तुकाराम मुंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?

"नाही, माझी एफडीएमधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे. असुरक्षित, निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त अन्न आणि बनावट औषधांविरुद्धची आमची लढाई अशीच पुढेही सुरूच राहील," असे सांगत त्यांनी आपल्यावरील बदलीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता स्पष्ट झाले आहे की, ते एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाचे कामही पाहणार आहेत.

पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षांमधील विविध अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीसाठी तीव्र आंदोलन केले होते. आंदोलक विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अत्यंत कडक आणि पारदर्शक अधिकाऱ्यामार्फत व्हावी अशी ठाम मागणी केली होती. विद्यार्थ्यांचा तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कार्यशैलीवर असलेला विश्वास लक्षात घेऊन राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आणि चौकशी समितीच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेत तब्बल १४ त्रुटी; सुनावणी लांबणीवर?

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Maharashtra Weather : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' जारी

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

SCROLL FOR NEXT