Tukaram Mundhe appointed secretary of MPSC paper leak inquiry committee 
महाराष्ट्र

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

MPSC Exam Controversy: MPSC चा भोंगळ कारभार आणि पेपरफुटीवरुन विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या लढ्याला यश आलंय. कारण आता MPSCतील भेसळ दूर करण्याची जबाबदारी थेट तुकाराम मुंढेंवर सोपवण्यात आलीय. तर अध्यक्ष भिमनवारांनाही सरकारनं मोठा झटका दिलाय. त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

एकीकडे राजधानी दिल्लीत ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पेटलेल असताना महाराष्ट्रातही MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पेटलं. अखेर पुण्यात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या ठिय्याला 11 व्या दिवशी यश आलं. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय. विशेष म्हणजे चौकशी समितीच्या सचिवपदी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीची घोषणा मंत्री शिवेद्रराजे भोसलेंनी करातच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. याशिवाय आंदोलक विद्यार्थांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवारांनी ट्विट करुन काय प्रतिक्रीया दिली ते पाहूया. MPSC पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.

विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्यात ते पाहूया.

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

MPSCमधील सुधारणेसाठीच्या चौकशी समितीत 5 सदस्यांचा समावेश

तुकाराम मुंढे हे चौकशी समितीचे सचिव म्हणून काम पाहणार

MPSCच्या सर्व परीक्षा ऑफलाईन होणार

प्रत्येक परिक्षा वेळेत घेण्यात येणार

रखडलेली भरती तत्काळ पूर्ण करण्यात येणार

वेटींग लिस्टबाबतचीही मागणी मार्गी लावणार

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार

3 वर्षात रिक्त पदं भरण्यात येणार

2027 'गट ब'च्या जागा वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक

'वन कार्ड' योजना मान्य, यासंदर्भात व्ही. राधा समिती निर्णय घेणार

चौकशी समितीची सूत्रं मुंढेंकडे दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राज्यातल्या अन्न आणि औषधांमधल्या भेसळीचे रॅकेज उद्ध्वस्त करणारे तुकाराम मुंढे एमपीएससीतल्या भेसळीखोरांचाही पर्दाफाश करणार का? आणि आयोगाचा कारभार पारदर्शक होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

SCROLL FOR NEXT