FDA Seizes Pakistani Cosmetic Products Saam TV Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, राज्यात खळबळ

Nanded FDA raid, Pakistani cosmetics : नांदेडमध्ये एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे ₹५० ते ₹६० लाख किमतीची ३७ प्रकारची कथित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त केली.

Namdeo Kumbhar

संजय सूर्यवंशी | नांदेड प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

FDA Seizes Pakistani Cosmetic Products : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून राज्यात धाडीचे सत्र सुरू झाले आहे. FDA च्या पथकांकडून राज्यभरात भेसळयुक्त पदार्थांवर धाडी टाकल्या जात आहेत. अनेक हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. आता नांदेडमध्ये FDA ने टाकलेल्या धाडीत चक्क पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. FDA च्या या धाडीनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने नांदेडमध्ये आली कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नांदेड शहरातील मन्यार गल्ली येथून 50 ते 60 लाखांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली आहे. FDA आणि नांदेड पोलिसांनी आज संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी कऱण्यात येत आहे. नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने आली कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलीस याची कसून चौकशी करत आहेत. यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचाही तपास केला जात आहे.

नांदेड शहरात देखील पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. रात्री FDA आणि नांदेड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा जप्त केला. नांदेड शहरातील मन्यार गल्ली येथे ही कारवाई करण्यात आली. मन्यार गल्ली भागात एका गोडाऊनमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा असल्याची माहिती FDA आणि पोलिसांना मिळाली . त्यावरून fda आणि पोलिसांनी या भागात धाड मारली , तेव्हा एका गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाचा साठा आढळला.

FDA आणि पोलिसांनी हा साठा जप्त केला.गोडाऊन मालकाला ताब्यात घेण्यात आले.याबाबचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान एकूण 37 प्रकारची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने या ठिकाणी आढळली. जवळपास 50 ते 60 लाख रुपयाचा हा साठा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी भेट देऊन पाहणी केली. सध्या कारवाई सुरू असून पूर्ण कारवाई झाल्या नंतर अधिक तपसील देऊ अस पोलीस अधीक्षक निलाभ रोहन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : डोकं शांत ठेवा! या 6 राशींना मिळणार मानसिक शांतता, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJP Protest: ज्ञानू मस्ट गो! दिपकेंचा इशारा; CJPचं मुंबईत जेल भरो आंदोलन

Tuesday Horoscope: नोकरीत नवीन जबाबदारी अन् आर्थिक लाभ; ‘या’ 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार फायदेशीर

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

SCROLL FOR NEXT