Nashik famous Misal hotels saam tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या FDA ची नाशिकच्या मिसळवर कारवाईची तर्री; शामसुंदरसह 5 हॉटेलला ठोकलं टाळं

Tukaram Mundhe FDA Action On Nashik Famous Misal Hotels: नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! तुकाराम मुंढे यांच्या FDA पथकाने तपासणीत अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्यानंतर पाच हॉटेल्सवर कारवाई केली.

Omkar Sonawane, अभिजीत सोनावणे साम टीव्ही नाशिक

देशभरात नाशिकची मिसळ ही सुप्रसिद्ध आहे. शहरात अनेक ठिकाणांहून लोक नाशिकला आली की पहिले मिसळवर ताव मारतात. तसेच रविवार हा नाशिककरांचा मिसळवार ठरलेला आहे. मात्र, हीच मिसळ नाशिककरांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे FDA च्या छापेमारीत समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून् अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे मोठ मोठे हॉटेल, मसाले, दूध डेअरीवर कारवाई करत आहे. आता त्यांनी आपला मोर्चा नाशिकमधील मिसळच्या दिशेने वळवला असून यामुळे शहरातील इतर मिसळ हॉटेलचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शहरातील पाच अन्न आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले आहेत. यानंतर प्रशासनाने चार हॉटेल्सचे अन्न सुरक्षा परवाने, तर एका आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी १९ नोव्हेंबर रोजी नाशिक शहरातील विविध हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी तसेच स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. संबंधित आस्थापनांकडून अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ मधील अनुसूची-४ चे उल्लंघन झाल्याचे आढळले.

कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सची नावे खालीलप्रमाणे

१. हॉटेल विहार

ठिकाण : जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक.

तपासणीत अस्वच्छ परिस्थिती आढळली.

अन्न सुरक्षा व मानक नियमांचे उल्लंघन.

अन्न तयार करण्याच्या ठिकाणी किटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव.

२. हॉटेल शामसुंदर

ठिकाण : एमआयडीसी, सातपूर, नाशिक.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन.

आस्थापनेमध्ये अस्वच्छ परिस्थिती आढळली.

स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबत गंभीर त्रुटी.

३. कॅफे दुर्गा कॅफे

ठिकाण : क्यूबवर्ल्ड बिझनेस सेंटर, कृषीनगर, कॉलेज रोड, नाशिक.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन.

अस्वच्छ परिस्थिती आढळली.

ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले.

मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा (Cooking Medium) उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले.

४. हॉटेल तुषार मिसळ

ठिकाण : असवारी चौकासमोर, मलेरिया स्टॉप, कॉलेज रोड, नाशिक.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन.

अस्वच्छ परिस्थिती आढळली.

अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा.

मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले.

५. हॉटेल महाराजा काठियावाडी

ठिकाण : आडगाव फाटा, आडगाव शिवार, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन.

आस्थापनेमध्ये अस्वच्छता आढळली.

स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आढळली.

मुदतबाह्य अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे आढळले.

अन्न तयार करण्याच्या ठिकाणी धूळ व किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूरमध्ये पाणी चोरी! मुख्य जलवाहिनीवर चोरट्यांचा डल्ला, 25 जणांवर कारवाई, 300 जणांना नोटीस

मुलीच्या भविष्यासाठी सरकारची भन्नाट योजना! दरमहा ₹5 हजार भरा अन् व्हा लाखपती

Kichen Tips : तांदूळ आणि डाळीत किडे झालेत? फेकून देण्याआधी करा हे 5 सोपे उपाय; धान्य राहील सुरक्षित!

Maharashtra News Live Update: गावांचा विकास हाच विकसित महाराष्ट्राचा पाया – मंत्री जयकुमार गोरे

नोटांचे बंडल, विदेशी चलन अन् सोन्याच्या विटा; CBIनं CGST अधीक्षकाच्या घरात टाकलेल्या धाडीत काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT