Tukaram mundhe FDA Loose Oil ban saam tv
महाराष्ट्र

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आजपासून राज्यात सुट्टे तेल विक्रीवर बंदी; नियम मोडाल तर खबरदार

Loose Oil Sales Banned Across Maharashtra: तुकाराम मुंढे यांनी आज मोठा निर्णय घेतला. आजपासून राज्यात सुट्टे तेल विक्रीवर बंदी घालण्यात आली. नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे.

Priya More
  • महाराष्ट्रात आजपासून सुट्टे खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी

  • सुट्ट्या तेलाच्या विक्रीबाबत तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

  • सुट्टे तेल विकणाऱ्या दुकानदारांवर आता कठोर कारवाई होणार

  • अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यतेल विक्रीबाबत नवा आदेश जारी

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मोठा निर्णय घेतला. राज्यात आजपासून सुट्ट्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळसह सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी आता आपला मोर्चा थेट खाद्यतेलाकडे वळवला आहे. त्यांनी सुट्टे तेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे राज्यभरातील दुकानदारांना सुट्टे तेल विकता येणार नाही.

अन्न व औषध प्रशासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाच्या संदर्भात अंमलबजावणी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, आजपासून राज्यात सुट्टे तेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील कोणत्याच दुकानदारांना सुट्टे तेल विकता येणार नाही. जर या नियमांचे उल्लंघन केले तर त्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने नुकताच केलेल्या विविध तपासण्यांमध्ये खाद्यतेल क्षेत्रात १२ गंभीर बाबी आणि त्रुटी निदर्शनास आल्या. अनेक ठिकाणी वैध परवाना नसताना खाद्यतेलाची विक्री आणि प्रक्रिया केली जात असल्याचे आढळून आले. खाद्यतेलात भेसळ होत असून त्यात आरोग्यास घातक असणाऱ्या ट्रान्सफॅट्सचे प्रमाण जास्त आढळून आले. मोहिरीच्या तेलात देखील भेसळ केली जात आहे. तेलाचा मूळ स्रोत आणि एक्सपायरी डेट लपवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.

गंज लागलेल्या डब्यामध्ये तेलाचे पॅकिंग केले जात आणि विकले जात आहे. घातक प्लास्टिकचा देखील वापर तेलाच्या पॅकिंगसाठी केला जात आहे. या सर्वबाबी लक्षात आल्यानंतर एफडीने नवीन नियमावली जारी करत कारवाईचा इशारा दिला. यापुढे राज्यभरातील दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्य तेलाच्या पाकिटावर स्रोत आणि एक्सपायरी डेट असणं अनिवार्य करण्यात आले आहे. सुट्टी मिळणारं तेल कुठून आलं? कसं आलं? आणि एक्सपायरी कधी आहे? याची माहिती त्या पाकिटावर नसते. पण यापुढे ही सर्व माहिती असणं गरजेचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Benefits : सकाळी की संध्याकाळी? अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

Pradeep Purnekar : ठाण्यात राजकीय वादातून ५ राऊंड फायर अन्.. आरोपी पप्प्याला बेड्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT