Yavatmal ,  Saam Tv
महाराष्ट्र

Police Patil News : कार्यतत्पर पोलीस पाटलाची आत्महत्या; गाव शाेकसागरात

गुंज येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्यांनी उत्तम काम केले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

संजय राठोड

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील गुंज येथील पोलीस (police) पाटील यांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तुकाराम रामभाऊ भोने असे आत्महत्या केलेल्या पोलीस पाटील यांचे नाव आहे. (yavatmal latest marathi news)

गुंज येथील पोलीस पाटील यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना समाेर येताच त्यांना तातडीने पुसद येथील लाईफलाईन दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

विद्यमान पोलीस पाटील यांनी आत्महत्या केल्यामुळे गुंज परिसरात शोककळा पसरली आहे. तुकाराम भोने हे गेल्या १७ वर्षांपासून गुंज येथे पोलीस पाटील या पदावर कार्यरत होते. गुंज येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्यांनी उत्तम काम केले हाेते. भाेने यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT