Truck Drivers Strike Meeting  Saam tv
महाराष्ट्र

Truck Drivers Strike: ट्रक चालकांचा संप मिटणार? संपूर्ण राज्याचं मनमाडच्या बैठकीकडे लक्ष

Truck Drivers Strike News: ट्रक चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी नाशिकच्या मनमाड इंधन प्रकल्पात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

Vishal Gangurde

अजय सोनवणे, नाशिक

Truck Drivers Strike News:

हिट अँड रन कायद्याला देशासहित राज्यातही विरोध पाहायला मिळत आहे. राज्यभरातील हजारो ट्रक चालक संपावर गेले आहेत. इंधन पुरवठा करणारे ट्रक चालक देखील संपावर गेले आहेत. यामुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपावरही इंधनाचा तुटवडा पाहायला मिळत आहे. या संपामुळे जीवनाश्यक वस्तूवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मनमाडजवळील इंधन प्रकल्पातूनही होणार वाहतूक देखील बंद आहे. याचदरम्यान, ट्रक चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी नाशिकच्या मनमाड इंधन प्रकल्पात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील ट्रक चालक या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. काल ट्रक चालकांच्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागलं. या आंदोलनाची धग राज्यात आज मंगळवारी देखील कायम आहे.

ट्रक चालकांच्या संपावरून नाशिक मनमाड इंधन प्रकल्पात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी नाशिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हजेरी लावली आहे. या बैठकीत तेल कंपनी अधिकारी, महसूल प्रशासन आणि पोलीस आणि वाहतूकदरांमध्ये बैठक सुरु आहे. प्राथमिक बैठकीत तोडगा निघाला नसून चालक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनमाडमध्ये सुरु असलेल्या बैठकीला टँकर चालकांना बोलाविण्यात आलेले नाही. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बैठकीत काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टँकर चालकांसोबत बैठक सुरु

पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची टँकर चालकासोबत बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला बीपीसीएल, एचपीसीएल व इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी , पोलीस , महसूल प्रशासनाचे आधिकारी उपस्थित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

White Hair Care: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले? मग करा 'हा' घरगुती उपाय, महिन्याभरात दिसेल फरक

Maharashtra Politics : ठाकरेंना काँग्रेस नकोय की काँग्रेसलाच स्वबळावर लढायचंय? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

Thursday Horoscope: पैशाचं नियोजन करा अन्यथा...या राशींच्या व्यक्तींना बसणार आर्थिक फटका, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT