truck driver passed away in a accident at majalgaon telgaon highway saam tv
महाराष्ट्र

Beed Accident News : ऊसाचा ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

Majalgaon Telgaon Highway : पोलिसांना क्रेनच्या साह्याने ट्रक व ट्रॅक्टर वेगळे केले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात पाेलिसांना यश आले.

विनोद जिरे

Beed :

बीड जिल्ह्यातील माजलगाव तेलगाव महामार्गावरील (majalgaon telgaon highway) टालेवाडी फाट्यावर ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात (accident) झाला. या भीषण अपघतात दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या अपघातात एकाचा जागेवर मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही दुर्दैवी घटना मध्यरात्री घडली आहे. तेलगावकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला जालन्याकडे जाणाऱ्या भंगार साहित्य भरलेल्या ट्रकने चुकीच्या दिशेने येत समोरासमोर भीषण धडक दिली.

या अपघातात ट्रक चालक सय्यद इरफाश अहमद (वय 40, राहणार जुना जालना) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी दिंद्रुड पोलिस दाखल झाले. पोलिसांना क्रेनच्या साह्याने ट्रक व ट्रॅक्टर वेगळे केले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात पाेलिसांना यश आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT