pune bangalore national highway, satara news, satara accident news saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway Accident: पुलाच्या कठड्यावरुन वेण्णा नदीत ट्रक कोसळला,चालकाची प्रकृती चिंताजनक

Pune Bangalore Highway Accident: या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ओंकार कदम

Satara Accident News : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज (बुधवार) साता-यानजीक झालेल्या एका अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकास रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. (Breaking Marathi News)

घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अपघातग्रस्त ट्रक हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन (pune bangalore national highway) कोल्हापूरहून (kolhapur) पुण्याच्या (pune) दिशेने निघाला हाेता. या ट्रकमध्ये नारळाची पाेती हाेती.

दरम्यान ट्रकवरील चालकाचा चालू ट्रकमध्ये डोळा लागल्याने वाढे फाटा जवळ असणाऱ्या वेण्णा नदीवरील पुलाच्या कठड्याला ट्रक धडकला. यामध्ये ट्रकच्या पुढील बाजूचा भाग चालकासह नदीत कोसळला.

यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची नारळाची पोती हाेती. ही पोती पुलावरून खाली विखुरली गेली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमधील चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Puja Tips: बुधवारी गपणतीच्य पुजेमध्ये वापरा 'या' 5 गोष्टी; गणपती बाप्पाचा सदैव राहील आशीर्वाद

Teacher Salary: दीड लाख शिक्षकांवर टांगती तलवार; सोलापूरच्या ३ हजार शिक्षकांचा पगार थांबणार! काय आहे कारण ?

Mumbai Monorail : मोठी बातमी! येत्या शनिवारपासून मोनोरेल ट्रेनसेवा बंद राहणार, कारण?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

SCROLL FOR NEXT