Harishchandra fort Yandex
महाराष्ट्र

Harishchandra Fort: एकाचा शोध घ्यायला गेले अन् दोन सांगाडे सापडले, हरिश्चंद्रगडावर नेमकं काय घडलं?

Skeletons of two who went missing at Harishchandra Fort: हरिश्चंद्रगडाच्या १५०० फूट खोल दरीत दोन तरूणांचे सांगाडे सापडले आहे. यातला एक तरूण सहा महिन्यांपासून तर, एक ३ वर्षांपासून बेपत्ता होता.

Bhagyashree Kamble

हरिश्चंद्रगडाच्या १५०० फूट खोल दरीत दोन तरूणांचा सांगाडा सापडला आहे. यातला एक तरूण सहा महिन्यांपासून तर, एक ३ वर्षांपासून बेपत्ता होता. एका ट्रेकर ग्रुपला हे दोन्ही सापळे सापडले आहेत. मृतांच्या खिशात आढळलेले ओळखपत्र आणि मोबाईलच्या आधारे पोलिसांना दोघांची ओळख पटवण्यात यश आलं. मात्र, सापडलेल्या दोन्ही सांगाड्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गणेश होनराव (वय २२) आणि रोहित सांळुखे (वय २२) असं या दोन तरूणांची नावं आहेत. पोलिसांनी गणेश होनराव याची ओळख कपडे आणि आधार कार्डवरून पटवली. तर मोबाईल आणि कपड्यांवरून रोहित सांळुखेची ओळख पटवण्यात आली आहे. यातला रोहित सांळुखे मागील सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. तो पुण्यात इंजिनिअर म्हणून काम करत होता. १८ जूनला तो हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्याचवेळी १५०० फुट खोल दरीत पडला.

पोलिसांनी रोहितचे शोधकार्य सुरू केले. मात्र, पाऊस आणि दाट धुक्यामुळं रोहितच्या शोधकार्यात अनेक अडथळे येत होते. यानंतर रोहितच्या मृतदेहाचा शोधकार्य थांबवलं. पण रोहितच्या कुटुंबियांनी पुन्हा रोहितचा शोध घेण्यास विनंती केली. या विनंतीवरून एका ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीनं पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नानंतर ट्रेकर्स ग्रुपला रोहितचा सांगाडा सापडला. मोबाईल आणि कपड्याच्या आधारे रोहितची ओळख पटली. मात्र, त्यासोबत आणखीन एक सांगाडा आढळला.

सांगाड्याच्या खिशात आधारकार्ड आणि पॅन कार्ड देखील होते. त्यानुसार हा तरूण गणेश होनराव असल्याची माहिती मिळाली. तो मुळचा लातूर जिल्ह्यातील आहे. तो तीन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता. गणेश बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. घरातून निघून गेल्यानंतर गणेशनं हरिश्चंद्रगडावर येऊन आत्महत्या केली असावी असा, अंदाज पोलिसांनी वर्तवला. पोलिस दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून, दोघांचे डिएनएचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT